मालेगावातील अनेक गुन्हे उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 12:47 AM2018-10-08T00:47:17+5:302018-10-08T00:49:18+5:30
मालेगाव : मालेगाव शहर व कॅम्प विभागातील अनेक गुन्हे नाशिक ग्रामीण व मालेगाव पोलीस दलाने गेल्या आठ-दहा दिवसांत उघडकीस आणले असून, दुचाकी चोरी, कुत्तागोळी, गावठी कट्टा बाळगणे, घरफोडी, तरुणीचा खून आदी विविध गुन्ह्यांतील आरोपींना गजाआड केल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

येथील शहर पोलीस नियंत्रण कक्षातील सुसंवाद हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत निलोत्पल बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातर्फे घेण्यात आलेल्या बैठकीत गुन्हेगारी रोखण्याच्या दृष्टीने राबविण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान आठ-दहा दिवसात पोलिसांनी अनेक गुन्हेगारांना ताब्यात घेतले. परिसरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असून, नागरिकांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये, असे त्यांनी आवाहन केले. यावेळी पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, अजित हगवणे, पोलीस निरीक्षक विजय ठाकुरवाड, पवारवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक वांगडे आदी उपस्थित होते.दुचाकीचोरांना अटक१ आॅक्टोबर रोजी पोलीस उपनिरीक्षक कल्पेश चव्हाण यांनी दुचाकी चोरणाºया टिनुराज प्रदीप व्यवहारे (२१), रा. बसस्टॅँड जवळ, कुंदननगर ताहाराबाद, किरण हिराजी साळवे, रा. साळवे गल्ली, ताहाराबाद, पंकज निंबा बाविस्कर (३०), रा. ताहाराबाद या तिघांना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून चोरीच्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.