जिल्ह्यातील अनेक मजूर गावाकडे जाण्याच्या तयारीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 11:12 PM2020-05-03T23:12:33+5:302020-05-03T23:12:51+5:30
नाशिक : संचारबंदीमुळे मागील महिनाभरापासून शहरात अडकून पडलेले अनेक मजूर आता गावाकडे निघण्याच्या तयारीत असून, त्यादृष्टीने अनेकांनी तयारी सुरू केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : संचारबंदीमुळे मागील महिनाभरापासून शहरात अडकून पडलेले अनेक मजूर आता गावाकडे निघण्याच्या तयारीत असून, त्यादृष्टीने अनेकांनी तयारी सुरू केली आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार कमी व्हावा यासाठी देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे अनेक काम बंद आहेत. बांधकाम व्यवसाय ठप्प झाला आहे.
कामासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून शहरात आलेले अनेक मजूर यामुळे बेरोजगार झाले आहेत.
काम नसल्यामुळे त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला. काम नसल्यामुळे अनेकांना शहरात राहणे परवडेनासे झाले आहे. यामुळे अनेकांनी गावाकडे जाण्याची तयारी केली, मात्र लॉकडाउनमुळे ते शक्य झाले नाही.
महिनाभर मिळालेली मदत आणि जवळ असलेल्या पैशांवर त्यांनी कसेतरी दिवस काढले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदीत काही सूट देण्याची घोषणा केल्यानंतर अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अनेकांनी गावाकडे जाण्यासाठी परवांगीची जुळवाजळव करण्यास सुरु वात केली आहे. अनेकांना आशायेत्या दोन-तीन दिवसांत गावाकडे जाण्याची सोय होईल, अशी अनेक मजुरांना आशा आहे. लॉकडाउन नेमका कधी संपेल याचा कोणताही अंदाज नसल्याने आता गावाकडे गेलेले बरे असा विचार मजूरवर्ग करू लागला आहे.