अपघातग्रस्तांना वेळीच मदत केल्यास अनेकांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:26 AM2021-03-04T04:26:02+5:302021-03-04T04:26:02+5:30
वाहतूक अप्पर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या ‘हायवे मृत्युंजय दूत’ या संकल्पनेचा शुभारंभ सिन्नर शाखेच्या वतीने ...
वाहतूक अप्पर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या ‘हायवे मृत्युंजय दूत’ या संकल्पनेचा शुभारंभ सिन्नर शाखेच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या तसेच महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा सुनीता वाळुंज यांच्या हस्ते करण्यात आला. व्यासपीठावर वावी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते, सिन्नर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक सतीश भोर, सुनीता पठाडे, डॉ. राजेंद्र मुदबखे, डॉ. संतोष सपकाळ, डॉ. श्यामसुंदर झळके आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ‘मृत्युंजय दूत’ची संकल्पना विशद केली. वावीचे सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते यांनी मार्गदर्शन केले.
सिन्नर मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक सतीश भोर, डॉ. श्यामसुंदर झळके, सुनीता वाळुंज यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संतोष थेटे यांनी केले. यावेळी वाहतूक शाखेचे पोपट दराडे, छोटू रंगातवाण, दिनेश खैरनार, राजेंद्र पगारे तसेच विजय वाळुंज, साहेबराव बोडके, डॉ. मयूर जांगडा सर्व मृत्युंजय दूत उपस्थित होते.
फोटो - ०२ सिन्नर हायवे
सिन्नर येथे हायवे मृत्युंजय दूत संकल्पनेचा शुभारंभ करताना सहायक वाहतूक पोलीस निरीक्षक विजय आढाव, सागर कोते, सुनीता वाळुंज, श्यामसुंदर झळके, सतीश भोर, डॉ. मुदबखे आदी.
===Photopath===
020321\174902nsk_42_02032021_13.jpg
===Caption===
फोटो - ०२ सिन्नर हायवे सिन्नर येथे हायवे मृत्युंजय दूत संकल्पनेचा शुभारंभ करताना सहाय्यक वाहतूक पोलीस निरीक्षक विजय आढाव, सागर कोते, सुनीता वाळुंज, श्यामसुंदर झळके, सतीश भोर,डॉ.मुदबखे आदि.