कला क्षेत्रात अनेक संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 01:37 AM2019-01-05T01:37:43+5:302019-01-05T01:38:04+5:30
विद्यार्थ्यांना कला व क्रीडाक्षेत्रातही अनेक संधी उपलब्ध असल्याचे प्रतिपादन मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी केले. रावसाहेब थोरात सभागृहात मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सवाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या.
नाशिक : विद्यार्थ्यांना कला व क्रीडाक्षेत्रातही अनेक संधी उपलब्ध असल्याचे प्रतिपादन मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी केले.
रावसाहेब थोरात सभागृहात मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सवाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर बालकलाकार चैतन्य देवढे, विश्वजा जाधव आणि चैतन्य कुलकर्णी यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, डॉ.सुनील ढिकले, राघो अहिरे, भाऊसाहेब खातळे, नाना महाले, अशोक पवार, हेमंत वाजे, डॉ. प्रशांत देवरे, सचिन पिंगळे, गुलाब भामरे आदी उपस्थित होते. यावेळी सांस्कृतिक प्रकारात प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कारांचे सादरीकरण केले. प्रास्ताविक सी. डी. शिंदे यांनी केले.
समूहनृत्य : प्राथमिक विभाग : अभिनव बालविकास मंदिर : नाशिक (प्रथम), इंदिरानगर (द्वितीय), ओझरमिग (तृतीय).
समूहगीत : श्री सी. एस. विद्यालय मखमलाबाद (प्रथम), मराठा हायस्कूल, नाशिक (द्वितीय), स्वामी विवेकानंद विद्यालय, कुंदेवाडी (तृतीय).
एकल नृत्य : माध्यमिक विभाग : बालशिक्षण मंदिर, गोरेराम लेन (प्रथम), जनता विद्यालय, वडाळीभोई (द्वितीय), जनता विद्यालय, सोनांबे (तृतीय).
एकल गीतगायन : आरूढ विद्यालय, म्हाळसाकोरे (प्रथम), जिजामाता हायस्कूल, सटाणा (द्वितीय), वाघ गुरुजी माध्यमिक विद्यालय, नाशिक (तृतीय).
एकपात्री नाट्यप्रयोग : जनता विद्यालय, वडनेरभैरव (प्रथम), बालशिक्षण मंदिर, गोरेराम लेन (द्वितीय), जनता इंग्लिश स्कूल, दिंडोरी (तृतीय).