बळीराजाने मांडल्या अनेक व्यथा

By admin | Published: December 19, 2015 10:39 PM2015-12-19T22:39:11+5:302015-12-19T22:48:22+5:30

दुष्काळ पाहणी दौरा : समस्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार

Many people suffer from diarrhea | बळीराजाने मांडल्या अनेक व्यथा

बळीराजाने मांडल्या अनेक व्यथा

Next

कळवण : ओतूर येथील लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी निधीची तरतूद, सप्तशृंगगडावरील प्रलंबित विकासकामे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, कळवण उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक साधन सामग्री, शिरसमणी येथील पाणीपुरवठा योजना, निवाणे पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी शासन स्तरावरून आर्थिक मदत, आत्महत्त्याग्रस्त कुटुंबीयांना मदतीचा हात देण्याचे आश्वासन कुर्ल्याचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी कळवण येथे दिले.
शिवसेनेच्या आमदारांनी कळवण तालुक्यात दुष्काळ पाहणी दौऱ्यादरम्यान ठिकठिकाणी भेटी देऊन कामांची व प्रलंबित कामांची पाहणी करून शेतकरी व अधिकारी वर्गाशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. कळवण तालुक्यातील समस्यांचा अहवाल सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना सादर केला जाणार असून, तालुक्यातील समस्या व मागण्या शिवसेनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करू व पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन आमदार मंगेश कुडाळकर यांनी दिले. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना तालुकाप्रमुख जितेंद्र वाघ, विधानसभा संपर्कप्रमुख दशरथ बच्छाव, तहसीलदार अनिल पुरे, तालुका उपप्रमुख गिरीश गवळी, राजू वाघ, तालुका संघटक संभाजी पवार, कळवण बाजार समितीचे संचालक शीतलकुमार अहेर, शहरप्रमुख, नगरसेवक साहेबराव पगार, विनोद मालपुरे, ललित अहेर यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील शेतकरी समस्यांनी त्रस्त झाला आहे. त्याच्यावर समस्या आणि संकटांचा डोंगर कोसळला आहे. सर्वसामान्य जनता अडचणीत आहे. अशा परिस्थितीत त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. शिवसेना नेहमीच मदतीसाठी पुढाकार घेते. त्याचा एक भाग म्हणून कळवण या आदिवासी तालुक्यातील जनतेच्या समस्या जाणून घेऊन मदत करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. आम्ही सत्तेत आहोत. त्यामुळे शासनाच्या माध्यमातून या भागातील प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याचा निर्णय घेतला असून, पाणी, रस्ते, आरोग्य, पर्यटन या प्रश्नांबरोबर या भागातील प्रश्न शिवसेनेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निदर्शनास आणून देऊन शासनस्तरावरून प्रश्न सोडविण्याची ग्वाही आमदार मंगेश कुडाळकर यांनी यावेळी दिली. आमदार कुडाळकर यांचे कळवण तालुक्यात ११ वाजता आगमन झाल्यानंतर नांदुरी येथून त्यांनी दौऱ्यास प्रारंभ केला.
कळवण तालुक्यातील नांदुरी येथील ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्याशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. सप्तशृंगगडावर भगवतीमातेचे दर्शन घेऊन १२ वाजेची महाआरती करून सप्तशृंगनिवासिनी देवी ट्रस्ट कार्यालयात त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. सप्तश्रृंगगडावरील दरड प्रतिबंधक कामाची पाहणी केली. सप्तशृंगगडावरील अंतर्गत रस्ते शिवाय पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी ग्रामस्थांना दिली. सप्तशृंगगडावर पाणीपुरवठा करणाऱ्या भवानी पाझर तलावाची पाहणी केली. यासंदर्भात पाटबंधारे विभागाच्या यंत्रणेकडून माहिती घेऊन शासनस्तरावरून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. आठंबे येथील कृषी विभागाच्या पुढाकारातून बांधलेल्या वनराई बंधाऱ्याचे कौतुक करून कुडाळकर यांनी पाण्याचे पूजन केले. ओतूर येथील लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. प्रकल्पाचे काम सुरू असताना बंद का केले, असा प्रश्न कुडाळकर यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारला. सात कोटी १२ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता असलेल्या या प्रकल्पाला शासनस्तरावरून आठ लाख रु पयांची तरतूद केली असल्याची माहिती यावेळी यंत्रणेने दिली. शिरसमनी येथील पाणीपुरवठा योजनेसाठी व ओतूर प्रकल्प प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे सेनेच्या माध्यमातून पाठपुरावा करण्याचे आश्वासन कुडाळकर यांनी यावेळी ग्रामस्थांना दिले.
कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. व्यवहारे यांच्या मनमानी कारभाराविषयी तक्रारी शिवसेनेच्या पदाधिकारी व ग्रामस्थांनी केल्या. शिवाय अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या आरोग्याशी यंत्रणा खेळते. सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरले जाते. रुग्णांवर उपचार न करता त्यांना नाशिक येथे पाठविण्याची भूमिका घेतली जाते याकडे लक्ष वेधले. याबाबत कुडाळकर यांनी आपल्या मुंबई शैलीत कामकाजात सुधारणा करण्याचा सल्ला देऊन पुढील दौऱ्यात तक्ररी येऊ देऊ नका, असा मोफत सल्ला त्यांनी दिला. निवाणे येथील पाझर तलावाची पाहणी करून दुरु स्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
तालुक्यातील कर्जामुळे आत्महत्त्या करणारे निवाणे येथील कै. कैलास अहेर व कै. दीपक निकम यांच्या कुटुंबीयांची आमदार कुडाळकर यांनी भेट घेऊन कुटुंबाचे सांत्वन केले आणि शिवसेनेच्या वतीने व शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
कळवण बाजार समितीच्या कार्यालयात आमदार कुडाळकर यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
शिवसेनेचे व बाजार समितीचे संचालक शीतलकुमार अहेर, विष्णू बोरसे, सुनील देवरे, रवींद्र हिरे, अतुल पवार यांच्या हस्ते कुडाळकर यांचा सत्कार करण्यात आला. पाहणी दौऱ्यात पप्पू पवार, मोतीराम निकम, विजय पगार, अंबादास जाधव, विनोद मालपुरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.(वार्ताहर)

Web Title: Many people suffer from diarrhea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.