ध्रुवनगर वसाहतीत अनेक समस्या; सुविधांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 12:46 AM2018-08-30T00:46:14+5:302018-08-30T00:46:50+5:30
येथील प्रभाग क्र मांक ९ मधील ध्रुवनगर वसाहत अतिशय वेगाने विकसित होणारी वसाहत आहे. कष्टकऱ्यांपासून ते उद्योजकांपर्यंतचे नागरिक या वसाहतीत वास्तव्याला आहेत. या नगरातील अनेक समस्या अजून सुटलेल्या नाहीत. प्रशस्त उद्यान नाही.
सातपूर : येथील प्रभाग क्र मांक ९ मधील ध्रुवनगर वसाहत अतिशय वेगाने विकसित होणारी वसाहत आहे. कष्टकऱ्यांपासून ते उद्योजकांपर्यंतचे नागरिक या वसाहतीत वास्तव्याला आहेत. या नगरातील अनेक समस्या अजून सुटलेल्या नाहीत. प्रशस्त उद्यान नाही. अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. मनपा प्रशासनाने दखल घेऊन मूलभूत सोयीसुविधा पुरवाव्यात, अशी मागणी केली जात आहे. सातपूर विभागातील प्रभाग क्र मांक ९ मधील ध्रुवनगर हा मोठा भाग आहे. ही वसाहत तशी जुनी आहे. मात्र गेल्या दहा वर्षांत या वसाहतीचा झपाट्याने विकास होत आहे. बंगले आणि गगनचुंबी इमारती उभारल्या जात आहेत. त्यामुळे त्यांच्या गरजाही वाढत आहेत. या भागाची लोकसंख्याही खूप आहे. जवळच मोतीलाल मेडिकल कॉलेज आहे. गंगापूर रोड काही अंतरावर आहे. ध्रुवनगर भागात अनेक समस्या आहेत. त्यात प्रशस्त उद्यानाची आवश्यकता आहे. घंटागाडी नियमित येत नाही. साफसफाई वेळेवर केली जात नसल्याची नागरिकांची तक्र ार आहे. युवकांसाठी अद्ययावत व्यायामशाळा नाही, विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वाचनालय नाही. अंतर्गत रस्त्यांची तर खूपच दयनीय अवस्था झालेली आहे. काही अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण होणे बाकी आहे. काही ठिकाणच्या रस्त्यावरील खडी वर येऊन मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. वाहनधारकांना कसरत करून वाहने चालवावी लागत आहेत. महानगरपालिका प्रशासनाने ध्रुवनगरला भेट देऊन पाहणी करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. ध्रुवनगरात मोठे जलकुंभ उभारण्यात आल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटली आहे.