जुन्या ईटीआय मशीन्समुळे अनेक अडचणी; बॅटरी साथ देत नसल्याने मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:25 AM2021-03-04T04:25:06+5:302021-03-04T04:25:06+5:30

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या वाहकांना तिकिटासाठी ईटीआय मशीन्स देण्यात आलेली आहेत. या मशीन्ससंदर्भात राज्यातील अनेक विभागांमध्ये ...

Many problems due to old ETI machines; Annoyed by not having battery support | जुन्या ईटीआय मशीन्समुळे अनेक अडचणी; बॅटरी साथ देत नसल्याने मनस्ताप

जुन्या ईटीआय मशीन्समुळे अनेक अडचणी; बॅटरी साथ देत नसल्याने मनस्ताप

Next

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या वाहकांना तिकिटासाठी ईटीआय मशीन्स देण्यात आलेली आहेत. या मशीन्ससंदर्भात राज्यातील अनेक विभागांमध्ये अडचणी येत असल्याच्या तक्रारी समोर आलेल्या आहेत. त्या तुलनेत नाशिकमध्ये मशीन्स बिघडण्याचे प्रमाण कमी असल्याचे सांगितले जात असले तरी दररोज बिघाड होणाऱ्या मशीन्सचे प्रमाण शंभरपेक्षा अधिक आहे. विशेेष म्हणजे नादुरुस्त यंत्रांमुळे वाहकांकडे नाहक संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे.

प्रवाशांना ईटीआयएम मशीनच्या माध्यमातून तिकीट देण्यास २०१६ पासून प्रारंभ झाला आहे. बसमध्ये तिकीट ट्रे सांभाळण्यापेक्षा यंत्रे सोपे आणि हाताळण्यायोग्य असल्याने वाहकांकडूनही या यंत्रणेचे स्वागत करण्यात आले. आजही या मशीन्स अस्तित्वात आहेत. आता या यंत्रणेला चार वर्षे पूर्ण झाली असून, त्यांमध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत.

नाशिक विभागामध्ये सुमारे १९०० इतके वाहक आहेत; तर ईटीआयएम मशीन्सची संख्या २४८४ इतकी आहे. त्यामुळे जवळपास ३०० ते ४०० यंत्रे स्टँडबाय ठेवण्यात आलेल्या आहेत. यंत्रांना ज्या अडचणी येतात त्यामध्ये शक्यतो पेपर रोल, बेसिक बटन, बॅटरी डिस्चार्ज आणि प्रिंटरची अडचण उद‌्भवते. या अडचणी सोडविण्यासाठी स्थानिक पातळीवर संबंधित कंपनीकडून सेंटर सुरू करण्यात आले आहे. प्रत्यक्षात बसमध्ये कामगिरीवर असताना अडचण आली तर तिकीट ट्रेचा वापर केला जातो. मात्र हिशेब आणि तांत्रिक अडचणींचा रोख कायम वाहकावरच ठेवला जातो. याचा मनस्ताप वाहकांना सहन करावा लागतो.

--इन्फो--

रोज १००पेक्षा अधिक बिघाड

विभागासाठी २४८४ इतकी ईटीआयएम मशीन्स उपलब्ध आहेत. विभागातील चालकांना देण्यात आलेल्या मशीन्सपैकी दररोज १०० ते १२५ इतक्या तक्रारी प्राप्त होतात.

--इन्फो--

वर्षभरात हजारो तक्रारी

१) ईटीआयएम मशीन्सच्या तक्रारी किरकोळ असल्या तरी वाहकाला त्याचे उत्तर द्यावे लागते. विशेषत: कामावर असताना यंत्रात बिघाड झाला आणि मॅन्युअल तिकीट दिल्यानंतर वाहकाला हिशेब जुळविण्यासाठीचे उत्तर द्यावे लागते.

२) यंत्रे जुनी झाल्याने ती बदलण्यात यावी अशी वाहकांची मागणी आहे. मात्र पाच वर्षांचा करार असल्यामुळे तात्पुरती दुरुस्ती करून यंत्रे वाहकाच्या हवाली केली जातात. त्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवला जातो.

३) ईटीआयएम मशीन्स जुनी झाल्याने बॅटऱ्या त्यांना साथ देत नाहीत. कित्येकदा एक बटण दाबल्यानंतर भलतीच कमांड यंत्राला मिळते. यातून तिकीट अंतर आणि भाड्यामध्ये तफावत दिसते. त्याचा फटका वाहकांना बसतो.

---इन्फो--

एक वाहक

जुन्या ईटीआयएम मशीन्समुळे तांत्रिक अडचणी येतात. मात्र वाहकाला दोषी धरले जाते. यंत्र बिघडले तर वाहकाला जबाबदार धरू नये. यंत्रणा जुनी झाली असल्याने बॅटरीची अडचण सातत्याने येते.

- विश्वास साबळे, वाहक

अनेकदा यंत्रातील बिघाडामुळे तिकीट दरात तफावत येते. तिकीट तपासणीस वाहकाला दोषी धरतात. अडचणी लक्षात न घेता अनेकदा कारवाईला सामोरे जावे लागते. तपासणिसाच्या अहवालावर वाहकावर कारवाई लागलीच केली जाते. हे थांबवावे.

- एक वाहक

--कोट--

नाशिक विभागात ईटीआयएम मशीन्सच्या कोणत्याही मोठ्या अडचणी नाहीत. किरकोळ दुरुस्ती लागलीच केली जाते. नादुरुस्त यंत्रणेबाबत वाहकाला जबाबदार धरले जात नाही. फार मोठी अडचण असल्यास विचारणा होऊ शकते. वाहकाला संपूर्ण बाजू मांडण्याची संधी दिली जाते.

- आर. एन. पाटील, विभाग नियंत्रक, नाशिक

Web Title: Many problems due to old ETI machines; Annoyed by not having battery support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.