एकलहरे, सामनगाव झोपडपट्टी भागात अनेक समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 11:55 PM2019-05-20T23:55:19+5:302019-05-21T00:06:30+5:30
येथील एकलहरे व सामनगाव झोपडपट्टीत अनेक समस्या आहेत. या दोन्हीही झोपडपट्ट्यांमध्ये ग्रामपंचायतींनी सोयी-सुविधा पुरविल्या असल्या तरी काही ठिकाणी अस्वच्छ गटारी, गलिच्छपणा, सांडपाण्याचा निचरा, अंतर्गत रस्ते, भटक्या कुत्र्यांचा त्रास, बेशिस्त वाहतूक अशा अनेक समस्या आहेत.
एकलहरे : येथील एकलहरे व सामनगाव झोपडपट्टीत अनेक समस्या आहेत. या दोन्हीही झोपडपट्ट्यांमध्ये ग्रामपंचायतींनी सोयी-सुविधा पुरविल्या असल्या तरी काही ठिकाणी अस्वच्छ गटारी, गलिच्छपणा, सांडपाण्याचा निचरा, अंतर्गत रस्ते, भटक्या कुत्र्यांचा त्रास, बेशिस्त वाहतूक अशा अनेक समस्या आहेत.
एकलहरे वीज केंद्राच्या स्थापनेनंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येथे पोट भरण्यासाठी नागरिकांंचे लोंढे आले. कालांतराने येथील पाटबंधारे खात्याच्या जागेवर झोपड्या बांधून स्थिरावले. काही नागरिक महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यातूनही आले. येथे शेतीची कामे, बिगारी कामे, ठेकेदारी कामगार म्हणून उदरनिर्वाह करू लागले. हळूहळू संख्या वाढत जाऊन आजमितीस चार ते पाच हजार लोकसंख्या झाली. पाटाच्या उत्तरेकडील झोपडपट्टी एकलहरे ग्रामपंचायत हद्दीत तर पाटाच्या दक्षिणेकडील झोपडपट्टी सामनगाव ग्रामपंचायत हद्दीत नोंद झाली. त्यामुळे येथील नागरिकांना रस्ते, वीज, पाणी, गटारी, आरोग्य, स्वच्छतागृहे या मूलभूत सुविधा दोन्ही ग्रामपंचायतींनी पुरविल्या आहेत. एकलहरे ग्रामपंचायत हद्दीतील झोपडपट्टीचा प्रभाग एक झाला, तर सामनगाव झोपडपट्टीला मळे विभागाचा काही भाग जोडून प्रभाग क्र मांक चार झाला आहे.
येथील सरपंच मोहिनी जाधव या विभागाच्या सरपंच आहेत. त्यामुळे झोपडपट्टीच्या भुयारी गटार योजना, नळपाणीपुरवठा योजना मार्गी लागल्या आहेत. आरोग्य सेवेसाठी या भागातील नागरिकांना अनेक अडचणी येतात. म्हणून येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे, अशी मागणी येथील माजी सरपंच राजाराम धनवटे, सामाजिक कार्यकर्ते सागर जाधव, सामनगावचे उपसरपंच सचिन जगताप यांनी वारंवार केली आहे.
सर्वसामान्य नागरिकांना गुंडांचा त्रास
दोन्हीही झोपडपट्ट्यांमध्ये ग्रामपंचायतींनी सोयी-सुविधा पुरविल्या असल्या तरी काही ठिकाणी अस्वच्छ गटारी, त्यातून डुकरांचे वास्तव्य, गलिच्छपणा, सांडपाण्याचा निचरा, अंतर्गत रस्ते, भटक्या श्वानांचा त्रास, बेशिस्त वाहतूक, रस्त्यावरच उभ्या राहणाºया राखेच्या गाड्या, रस्त्याच्या चौकातून उभे राहणारे टवाळखोर, अवैध धंदे, देशी दारूच्या विक्र ीचे व्यवसाय, राजरोसपणे चाकू-सुरे घेऊन होणाºया हाणामाºया या सर्वांचा त्रास येथील व्यवसाय करणारे व्यावसायिक व गोरगरीब नागरिकांना सहन करावा लागतो. त्यामुळे अवैध व्यवसाय व गुंडगिरीची समस्या सोडविणे गरजेचे आहे, अशी येथील महिलांची प्रतिक्रि या आहे.