...अनेकांनी आपल्या प्रिय व्यक्तीला सांगितली ‘मन की बात’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:16 AM2021-02-09T04:16:30+5:302021-02-09T04:16:30+5:30
शहर व परिरसरात माध्यमिक शाळांची घंटा वाजली असली तरीदेखील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाविद्यालये अद्याप खुली करण्यात आलेली नाही. यामुळे तरुणाईचा ...
शहर व परिरसरात माध्यमिक शाळांची घंटा वाजली असली तरीदेखील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाविद्यालये अद्याप खुली करण्यात आलेली नाही. यामुळे तरुणाईचा जल्लोष कॉलेज रोड परिसरात काहीसा कमी नजरेस पडत आहे; मात्र आऊटिंगकरिता तरुण, तरुणींकडून शहराला लागून असलेल्या विविध निसर्गरम्य स्थळांना पसंती दिली जात आहे. तरुणाईने दुचाकी, चारचाकींमधून आपल्या प्रिय व्यक्तीला तिच्या आवडत्या ठिकाणी घेऊन जात प्रपोझ डे साजरा केला. तसेच शहरातील कॅफे, रेस्टॉरंटवरदेखील व्हॅलेंटाईन सप्ताहची रंगत पहावयास मिळत आहे. विविध गिफ्ट शॉपींच्या परिसरात तरुणाईची रेलचेल असून आपल्या आवडत्या व्यक्तीची मने जिंकण्यासाठी कोणती वस्तू तिचे किंवा त्याचे मन जिंकून घेईल, या विचाराने खरेदीचा ‘मुहूर्त’ साधत आहेत.
‘प्रपोज डे’च्या औचित्यावर तरुणाईने आपल्या आवडत्या व्यक्तींकडे आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. तसेच बहुतांश कपल्सनेसुध्दा आपल्या जोडिदारासोबत ‘प्रपोज डेच्या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा दिला. एकूणच ‘प्रपोझ डे’च्या निमित्ताने संध्याकाळी बोचऱ्या थंडीत अनेकांनी आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत शहरातील कॅफे, रेस्टॉरंटमध्ये वेळ घालविला. ज्या मुलीवर किंवा मुलावर ‘क्रश’ आहे, अशांसाठी या दिवसाची जणू सुवर्णसंधीच होती. बहुतांश तरुण, तरुणी या दिनाची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात. आपल्या आवडत्या व्यक्तींचा मूड आणि आवडीनिवडी लक्षात घेत होकार मिळावा यासाठी अत्यंत सावधपणे अनेकांनी आपल्या प्रियजनांकडे प्रस्ताव मांडला. यासाठी बहुतांश तरुण, तरुणींनी भेटवस्तुूचाही आधार घेतल्याचे दिसून आले.
--इन्फो---
...मनात धाकधूक कायम
प्रेम करणं सोपं वाटत असलं तरीदेखील ते आपल्या प्रिय व्यक्तीसोबत व्यक्त करणे अर्थातच प्रपोझ करताना मात्र अनेकांच्या मनात धाकधूक असतेच. तशी भीती तरुणाईमध्ये पहावयास मिळाली; कारण होता ‘नकार’ मिळाला तर? म्हणूनच काहींचा प्रपोझ करताना थरकापही उडाला. अनेकांनी मन घट्ट करत ‘जास्तीत जास्त काय होईल, नकारच मिळेल ना, मात्र मन की बात बोलून टाकली याचे समाधानही लाभेल’ अशा सकारात्मक विचाराने संधी साधली.
---
फोटो क्र : ०८पीएचएफबी७१
===Photopath===
080221\08nsk_25_08022021_13.jpg
===Caption===
गंगापुर धरण परिसर