इगतपुरी तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 12:20 AM2019-08-05T00:20:46+5:302019-08-05T00:21:20+5:30
इगतपुरी : तालुक्यात गेल्या दहा दिवसांपासून धुवाधार पाऊस कोसळत असून, तालुक्यातील अनेक गावांचा संपर्कतुटला आहे. मध्य रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. अनेक गाड्या रद्द झाल्या आहेत.
इगतपुरी : तालुक्यात गेल्या दहा दिवसांपासून धुवाधार पाऊस कोसळत असून, तालुक्यातील अनेक गावांचा संपर्कतुटला आहे. मध्य रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. अनेक गाड्या रद्द झाल्या आहेत.
शनिवारी मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाने जोर धरल्याने मुंबई व कसारा रेल्वेस्थानकात प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने मध्य रेल्वेच्या मुंबई व कसारा अप व डाउनची वाहतूक ठप्प झाली आहे. तर कसारा घाटातील जुना महामार्ग गेल्या आठवड्यापासून बंद असून नवीन कसारा घाटातून मुंबईला जाणारी व येणारी वाहतूक एकेरी मार्गाने संथ गतीने सुरू होती. नवीन कसारा घाटातही रस्त्याला रविवारी तडे पडल्याने या वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तालुक्यात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरू असून, तालुक्यातील सर्व धरणे तुडुंब भरली आहेत. यामुळे या सर्व धरणांतून हजारो क्यूसेक पाणी सोडण्यात येत असल्याने गावांना जोडणारे बरेच पूल पाण्याखाली गेल्याने काही गावांचा संपर्कतुटला आहे. इगतपुरी शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावर दोन ते तीन फूट पाणी साठत असल्याने हे पाणी थेट नागरिकांच्या घरात व दुकानात घुसल्याने लाखो रुपयांची हानी झाली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील मुंढेगावजवळ दोन ते तीन फूट दारणाकडे जाणारे पाणी थेट महामार्गावर आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पाणी कमी झाल्यावर मुंबईला जाणारी वाहतूक संथगतीने सुरू करण्यात आली. तर नांदगावसदो, फांगुळगाव, पिंप्रीसदो आदी रस्त्यांवर पाणी आल्याने इगतपुरीत येण्यासाठी संपर्क तुटला होता.
इगतपुरी शहरातील खालची पेठ परिसरात रात्रीपासून धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. यामुळे परिसरातील वीजपुरवठा बंद होता. शहरातील लोया रोडवरती सर्व नाले तुंबले होते.
लोकांना घराबाहेर निघणे कठीण झाले होते. कॉन्व्हेंट हायस्कूलजवळील एक भिंतही पडली आहे. जोग महाराज भजनी मठ येथे जाणाºया रस्त्यावर पाणीच पाणी साचले होते.
जुन्या आग्रा रोडवरील गिरणारे गावाला जाणाºया रस्त्यावर कमरेएवढे पाणी साचले होते. मोठ्या वाहनचालकांना कसरत करावी लागली.दारणातून ३९२५० क्यूसेक पाण्याचा विसर्गनांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात पावसाने रविवारी सकाळपासून सर्वत्र हाहाकार करायला सुरु वात केली असून, गेल्या २४ तासांत विक्र मी २२२ मिमी. पावसाची नोंद झाली. रविवारी एकूण ९८.३९ टक्के पाऊस पडला आहे. सकाळपासून तर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून, परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दारणा धरणाच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या धरणातून दारणा धरण भरले असून, खबरदारीचा उपाय म्हणून नाशिक जलसंपदा विभागाने रविवारी सकाळी नऊ वाजता विसर्ग सुरू केला. यंदाच्या पावसाळ्यात दारणातून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू झाला असून, सकाळी नऊ वाजेपासून सुमारे ३९२५० विक्र मी क्यूसेक प्रतिवेगाने पाणी नांदूरमधमेश्वरकडे निघालेले आहे.
च्शहरातील रविवारच्या आठवडे बाजारात शुकशुकाट होता. बाजारातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने दुकानांचे हाल झाले होते. धुवाधार पाऊस पडत असल्याने ग्राहकांनी बाजारात येण्याचे टाळले, यामुळे बाजारपेठ मंदावली होती.