सुरगाणा तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2022 11:06 PM2022-07-11T23:06:52+5:302022-07-11T23:07:42+5:30
बोरगाव : सुरगाणा तालुक्यातील राक्षसभुवनकडे जाणारा कोडीपाडा-ठाणगाव घाट रस्त्यावर पावसामुळे दरड कोसळून रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील राक्षसभुवन, करंजुल, भवडा, काहनडोळचोंड, आमदा बाऱ्हे, खिराटमाळ, मांडवे, करवळपाडा, गुजरात मधील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सुरगाणा तालुक्यातील पार नदीवर असणाऱ्या उंबुरणे-बेजावड पुलावरून पाणी गेल्याने पेठ तालुक्यातील झरी, अंबास, सावरणा कुंभाळे तसेच खिर्डी उंबरने, भाटी, भेनशेत आदी गावांचा संपर्क तुटला आहे.

तालुक्यातील ननाशी-बाऱ्हेच्या हस्ते घाटात दरड कोसळली असून माती खचून पूर्णपणे रस्त्यावर आली आहे. त्यामुळे हा मार्ग देखील बंद झाला आहे. नानाशी येथून नाशिक जाताना बाऱ्हे, ठाणगाव अंभोरे, गडगा आदी भागातील संपर्क तुटला आहे. सुरगाणा-बाऱ्हे कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर झाड पडल्याने दांडीची बारी, म्हसमाळ, शिरीषपाडा आदी गावाचा संपर्क तुटला आहे. तालुक्यातील गुरटेंभी येथील ताराबाई बन्सू भिवसन यांचे घर कोसळले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुरगाणा तालुक्यातील बोरगाव,सुरगाणा,राहुडे, पायरपाडा, पळसन या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत झाली असून, हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. बोरगाव परिसरातील नदी नाल्याने पुलाच्या वरून पाणी वाहून जात असल्याने दळणवळणाची साधने बंद झाली आहेत. सापुतारा,चिखली,चिराई घाटात दरड कोसळेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.