नांदगाव महाविद्यालय मैदानावर पकडला मण्यार साप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 01:11 AM2021-11-17T01:11:18+5:302021-11-17T01:11:38+5:30
नांदगाव येथील महाविद्यालयाच्या खेळण्यासाठी तयार करण्यात ट्रॅकवरच चक्क अतिविषारी मण्यार जातीचा साप आढळून आल्याने खळबळ उडाली. दुपारी कॉलेज सुरू होण्याच्या कालावधीत विषारी साप मैदानावर असल्याचे बघून विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांचीदेखील काही त्रेधातिरपीट उडाली. नंतर सर्पमित्राने त्याला सुरक्षित पकडून जंगलात सोडून दिले.
नांदगाव : येथील महाविद्यालयाच्या खेळण्यासाठी तयार करण्यात ट्रॅकवरच चक्क अतिविषारी मण्यार जातीचा साप आढळून आल्याने खळबळ उडाली. दुपारी कॉलेज सुरू होण्याच्या कालावधीत विषारी साप मैदानावर असल्याचे बघून विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांचीदेखील काही त्रेधातिरपीट उडाली. नंतर सर्पमित्राने त्याला सुरक्षित पकडून जंगलात सोडून दिले.
कॉलेज ट्रॅकवर सकाळ, सांयकाळी खेळण्यासाठी नियमित गर्दी असते. सध्या थंडीचा काळ सुरू असल्याने कोब्रा, मण्यार, घोणस अशा विषारी सर्पांचा अधिवासाचाही काळ असल्याने व भक्ष्याच्या शोधार्थ ते निघू शकतात, अशी माहिती सर्पमित्र विजय बडोदे यांनी दिली.
त्यांनी एका बरणीत या अतिविषारी मण्यारला बंद केले व वनविभागाच्या हद्दीत जाऊन सोडले. महाविद्यालयालगत काही अंतरावर वनविभागाची हद्द असून या ठिकाणी बाहेर पकडून आणलेले सर्प सोडून दिले जातात. त्यामुळे महाविद्यालय परिसर, हनुमान नगर आदी नागरी वसाहतीमध्ये साप आढळून येणाऱ्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.