भाव वाढताच मका उत्पादकांनी फिरवली खरेदी केंद्राकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 01:05 AM2019-01-11T01:05:07+5:302019-01-11T01:05:26+5:30

आधारभूत किमतीत मका विक्री करण्यास तयार असलेल्या शेतकऱ्यांकडे हजारो क्विंटल मका पडून असल्यामुळे राज्य सरकारने खरेदी केंद्रांना मुदतवाढ दिली असली तरी, खुल्या बाजारात अचानक मक्याचे भाव वाढल्यामुळे शेतकºयांनी शासनाच्या केंद्राकडे पाठ फिरवून व्यापाºयांच्या दारात मका आणून टाकण्यास सुरुवात केल्यामुळे जिल्ह्यातील मका खरेदी केंद्रे ओस पडली आहेत.

Maqa growers shifted to the shopping center as prices rose | भाव वाढताच मका उत्पादकांनी फिरवली खरेदी केंद्राकडे पाठ

भाव वाढताच मका उत्पादकांनी फिरवली खरेदी केंद्राकडे पाठ

Next

नाशिक : आधारभूत किमतीत मका विक्री करण्यास तयार असलेल्या शेतकऱ्यांकडे हजारो क्विंटल मका पडून असल्यामुळे राज्य सरकारने खरेदी केंद्रांना मुदतवाढ दिली असली तरी, खुल्या बाजारात अचानक मक्याचे भाव वाढल्यामुळे शेतकºयांनी शासनाच्या केंद्राकडे पाठ फिरवून व्यापाºयांच्या दारात मका आणून टाकण्यास सुरुवात केल्यामुळे जिल्ह्यातील मका खरेदी केंद्रे ओस पडली आहेत.
नाशिक जिल्ह्यात ५४९२ शेतकºयांनी आधारभूत किमतीत मका विक्री करण्यासाठी शासनाकडे आॅनलाइन नोंदणी केली आहे. खुल्या बाजारात व्यापाºयांकडून कमी दरात मका खरेदी करून अडवणूक केली जात असल्यामुळे शासनाने यंदा १७०० रुपये क्विंटल असा दर दिला आहे. डिसेंबरअखेर जेमतेम आठशे शेतकºयांचा मका आजवर खरेदी केंद्रावर आला आहे. जिल्ह्यातील शेतकºयांकडील मका खरेदीसाठी दहा ठिकाणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
मध्यंतरी खुल्या बाजारात मक्याचे भाव अचानक दीडशे रुपयांनी वाढल्यामुळे शेतकºयांनी खरेदी केंद्राऐवजी व्यापाºयांना मक्याची विक्री केली, परंतु आवक वाढल्यामुळे पुन्हा मक्याचे भाव खाली आल्याने शेतकºयांनी खरेदी केंद्रावर धाव घेतली.
डिसेंबरअखेर जिल्ह्णात जवळपास पन्नास हजार क्विंटल मका शिल्लक असण्याच्या शक्यतेने शासनाने १५ जानेवारीपर्यंत मका खरेदीला मुदतवाढ दिली आहे. जिल्ह्णातील दहाही केंद्रांवर ही खरेदी होत असताना व्यापाºयांनी पुन्हा खुल्या बाजारात मक्याला १७८० रुपये दर जाहीर केल्याने शेतकºयांनी व्यापाºयांकडे धाव घेण्यास सुरुवात केली असून, गेल्या चार दिवसांपासून फक्त सिन्नर, मालेगाव, देवळा व लासलगाव या चारच केंद्रांवर शेतकºयांनी मका विक्रीसाठी आणला आहे.
अन्य केंद्रांवर मात्र मक्याची खरेदी होऊ शकलेली नाही. त्यामुळे शासनाने वाढवून दिलेली मुदत संपुष्टात येण्यास अवघ्या पाच दिवसांचा कालावधी शिल्लक असून, या काळात किती उत्पादक मका विक्रीसाठी केंद्रावर आणतात याकडे मार्केट फेडरेशनचे लक्ष लागले आहे.
सतरा रुपयांचा मका एक रुपयात
केंद्र सरकारच्या सहाय्याने राज्य सरकार आधारभूत किमतीत यंदा १७०० रुपये क्विंटल दराने शेतकºयांकडून मक्याची खरेदी करीत असून, तोच मका रेशनमधून शिधापत्रिकाधारकांना एक रुपया किलोप्रमाणे वाटप केला जाणार आहे. गेल्या वर्षीदेखील १४५० रुपये दराने खरेदी केलेला मका रुपयाच्या भावातच विकावा लागला होता. शिवाय मक्याची विक्री करणाºया रेशन दुकानदारास मात्र किलोमागे दीड रुपया कमिशन देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यंदा मक्याच्या उत्पादनात घट झाल्याने पोल्ट्री व्यावसायिकांनी केंद्र सरकारकडून परदेशातून मका आयात करण्याची परवानगी मागितली आहे, ते पाहता देशी मका एक रुपया किलोप्रमाणे शिधापत्रिकाधारकांना जबरदस्तीने वाटप केला जात आहे.

Web Title: Maqa growers shifted to the shopping center as prices rose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.