सुरगाणा तालुक्यात माकपाचे वर्चस्व
By admin | Published: February 24, 2017 12:43 AM2017-02-24T00:43:06+5:302017-02-24T00:43:20+5:30
सुरगाणा तालुक्यात माकपाचे वर्चस्व
सुरगाणा : तालुक्यातील गट - गणात पुन्हा माकपाचे वर्चस्व सिद्ध झाले आहे; मात्र माकपाच्या हातून एक गट व एक गण निसटला असून, याठिकाणी भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत.
सकाळी येथील तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र काकुस्ते व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व कडेकोट पोलीस बंदोबस्तात १० वाजता एकाचवेळी गट व गणातील मतमोजणीला सुरुवात झाली. साधारण २ वाजेपर्यंत संपूर्ण निकाल जाहीर झाले. यामध्ये अनेक वर्षांनी निवडणुकीत उतरलेल्या खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या पत्नी कलावतीताई चव्हाण या हट्टी गटातून विजयी झाल्या. त्यांनी माकपाच्या उमेदवार व माजी सभापती तथा विद्यमान पं.स. सदस्य मंदाकिनी भोये यांचा ३८७ मतांनी पराभव केला. चव्हाण यांना १०७३७ मते मिळाली.
हट्टी गण- एन.डी. गावित (भाजपा) यांना ७४३६ मते मिळून विजयी झाले. बोरगाव गणात सुवर्णा गांगोडे (माकप) यांना ४०७७ मते मिळून विजयी झाल्या.
भदर गणात आमदार जे.पी. गावित यांचे पुत्र व विद्यमान पंचायत समिती सदस्य इंद्रजित गावित (माकपा) यांना ८१७६ मते मिळून विजयी झाले. (वार्ताहर)