मराठा समाजाचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 04:16 PM2018-11-29T16:16:48+5:302018-11-29T16:17:07+5:30
सिन्नर: मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचा मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरील सरकारचा कृती अहवाल विधानसभेत गुरुवारी सादर करण्यात आला.
सिन्नर: मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचा मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरील सरकारचा कृती अहवाल विधानसभेत गुरुवारी सादर करण्यात आला. यानंतर सरकारने आरक्षणाबद्दलचे विधेयक विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मांडले. या दोन्ही सभागृहांमध्ये विधेयक एकमताने मंजूर झाले. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला. या निर्णयाचे सिन्नर शहरात शिवसेनेच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले. गुरुवारचा दिवस मराठा समाजासाठी ऐतिहासिक ठरल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. मराठा समाज आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक या तिन्ही निकषांवर मागास असल्याचा निष्कर्ष मागासवर्ग आयोगानं नोंदवला होता. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला. या निर्णयाचे सिन्नरला शिवसेनेच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष शैलेश नाईक, गटनेते हेमंत वाजे, नगरसेवक सोमनाथ पावसे, प्रमोद चोथवे, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, संजय सानप, नामदेव शिंदे, माजी नगरसेवक मनोज भगत, शिवसेनेचे शहरप्रमुख गौरव घरटे, बाजार समितीचे संचालक सुनील चकोर, लोकेश धनगर, रामनाथ पावसे, समाधान कांगणे, प्रशांत रायते यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.