भुजबळांची भेट न झाल्याने मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 10:47 PM2020-09-18T22:47:08+5:302020-09-19T01:34:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक- मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात निर्माण झालेला कायदेशीर तिढा सोढविण्यासाठी तातडीने महाअधिवेशन बोलवावे या मागणीसाठी ओबींसीचे नेते आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी गेलेल्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि.१८) ठिय्या मांडला. पूर्वनियोजीत कार्यक्रमामुळे भुजबळ हे त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर गेल्याने त्यांची भेट न झाल्याने कार्यक्रर्ते संत झाले आहेत.

Maratha Kranti Morcha aggressive as Bhujbal did not meet | भुजबळांची भेट न झाल्याने मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

भुजबळांची भेट न झाल्याने मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

Next
ठळक मुद्देप्रवेशव्दारावर चिटकवले निवदन; राजीनामा देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक- मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात निर्माण झालेला कायदेशीर तिढा सोढविण्यासाठी तातडीने महाअधिवेशन बोलवावे या मागणीसाठी ओबींसीचे नेते आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी गेलेल्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि.१८) ठिय्या मांडला. पूर्वनियोजीत कार्यक्रमामुळे भुजबळ हे त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर गेल्याने त्यांची भेट न झाल्याने कार्यक्रर्ते संत झाले आहेत. पालकमंत्र्यांनी जाणिवपूर्वक पाठ फिरवल्याचा आरोप करीत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. दुपारपर्यंत भेट न झाल्याने मागण्यांचे
निवेदन देऊन कार्यकर्ते माघारी फिरले. मात्र त्यांनी रोष व्यक्त करतानाच पालकमंत्री बदला अन्यथा रोषाला सामोरे जा असा इशारा या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला अंतिरीम स्थगिती दिली आहे. त्यामुळे त्यांनतर काढण्यात आालेली भरती आणि शैक्षणिक प्रवेश प्रक्रीयेत मराठा समाजाला आरक्षरणानुसार समाविष्ट करण्यात अडचणी येत असल्याने तातडीने महाअधिवेशन बोलाववावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आमदारांना निवेदन देण्यात येत आहे. तथापि, ओबीसींचे नेते असलेल्या छगन भुजबळ यांनी आरक्षणावर भूमिका जाहिर करावी यामागणीसाठी शहरातील भुजबळ फार्म येथे आंदोलन करण्याचे जाहिर करण्यात आले होत. त्यानुसार सकाळी कायकर्ते तेथे गेले होते. मात्र पूर्वनियोजीत कार्यक्रमामुळे भूजबळ हे त्र्यंबकेश्वर येथे नाशिक कृषी उत्पन्न बाजार
समितीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. त्यामुळे मोर्चाचे समन्वयक करण गायकर, तुषार जगताप, गणेश कदम, राजू देसले, शरद तुंगार यांच्यासह अन्य मान्यवरांच्या नेतृत्वाखाली तेथेच ठिय्या आंदोलन केले. मराठा आरक्षणाचा लाभ मिळू नये यासाठी अगोदर शैक्षणिक प्रवेश स्थगित करण्यात आले आणि नंतर स्थगितीनंतर शासकिय नोकर भरती करण्यात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
तसेच विधी मंडळाचे तातडीने अधिवेशन बोलवून वटहुकूम काढण्याची मागणी करण्यात आली.
दरम्यान, भुजबळ हे दुपारी एक वाजेपर्यंत न आल्याने कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आणि भुजबळ यांच्यावर रोष व्यक्त केला. समाजाचे आंदोलन ज्ञात असताना देखील त्यांनी जाणिवपूर्वक पाठ फिरवली असा आरोप करीत भूजबळ फार्म च्या प्रवेशव्दारावर निवेदन चिटकवून कार्यकर्ते माघारी गेले. भुजबळ यांच्या वागणूक आणि कृतीतला फरक यामुळे स्पष्ट झाल्याचे संघटनेच्या निवेदनात म्हंटले आहे. भुजबळ यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. मोर्चाने या आंदोलनात प्रमोद जाधव, शिवाजी मोरे, आशिष हिरे,
शिवा तेलंग, बंटी भागवत, सचिन पवार, विलास जाधव, उमेश शिंदे, निलेश मोरे, मधुकर कासार यांच्यासह अन्य आंदोलक सहभागी झाले होते.

पालकमंत्री बदला
समाजाच्या भावना जाणून न घेतल्याने मोर्चाच्या समन्वयकांनी छगन भुजबळ यांना पालकमंत्री पदावरून बदला अन्यथा रोषाला सामोरे जा असे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना दिलेल्या इशाºयात म्हंटले आहे.

मी भेटण्यास तयारच : भुजबळ
मराठा समाजाच्या आरक्षणाला माझा विरोध नाही, त्यामुळे उगच राजकारण करू नये असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. काही कार्यकर्ते शुक्रवारी (दि.१८) निवेदन देण्यासाठी आले होते. मात्र, पूर्वनियोजीत कार्यक्रमामुळे मी त्र्यंबकेश्वर येथे  कार्यक्रमासाठी गेलो होतो.
कार्यकर्ते जरा उशिरा येऊन थांबले असते तरी अडचण नव्हती. त्यांनी अगोदरही संपर्क केला असता तरी अडचण नव्हती. मात्र, कोणीही संपर्क साधलेला नाही. उलट कार्यकर्ते येणार असल्याचे कळल्यानंतर त्यांच्या बसण्याची आणि चहा पाण्याची व्यवस्थाही केली होती. आणि परतल्यानंतर भेटतो असा निरोप दिला होता, असे भुजबळ यांनी म्हंटले आहे. कार्यकर्ते मला केव्हाही येऊन भेटू शकतात. मी त्यांना भेटण्यास तयार असल्याचे भुजबळ यांनी माध्यमांना सांगितले.

 

Web Title: Maratha Kranti Morcha aggressive as Bhujbal did not meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.