मराठा क्रांती मोर्चा भुजबळ यांची घेणार भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 12:07 AM2020-09-20T00:07:08+5:302020-09-20T00:43:11+5:30
नाशिक- आरक्षण प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते आणि जिल्'ाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी आंदालन करण्यात आल्यानंतर त्यांची भेट न झाल्याने व्यक्त झालेला संताप ही केवळ उत्स्फुर्त प्रतिक्रीया होती. हा विषय मराठा क्रांती मोर्चाकडून संपला आहे. येत्या एक ते दोन दिवसात भुजबळ यांच्या समवेत समन्वयांची चर्चा होणार असल्याने आता कोणताही दुरावा नसल्याचे स्पष्टीकरण मोर्चाच्या पदाधिका-यांनी दिले आहे.
नाशिक- आरक्षण प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते आणि जिल्'ाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी आंदालन करण्यात आल्यानंतर त्यांची भेट न झाल्याने व्यक्त झालेला संताप ही केवळ उत्स्फुर्त प्रतिक्रीया होती. हा विषय मराठा क्रांती मोर्चाकडून संपला आहे. येत्या एक ते दोन दिवसात भुजबळ यांच्या समवेत समन्वयांची चर्चा होणार असल्याने आता कोणताही दुरावा नसल्याचे स्पष्टीकरण मोर्चाच्या पदाधिका-यांनी दिले आहे.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतिरीम स्थगिती दिल्याने समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. विधी मंडळाचे अधिवेशन तातडीने बोलवून यासंदर्भात वटहुकूम काढावा आणि शैक्षणिक तसेच नोकर भरतीपासून वंचीत राहणा-या समाजातील युवकांना दिलासा द्यावा अशी समाजाची मागणी आहे. त्या अनुषंगाने मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी (दि.१८) भुजबळ फार्म येथे कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तसेच भुजबळ यांची भेट न झाल्याने नाराजी व्यक्त केली होती. आंदोलनाच्या वेळी पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे
भुजबळ हे त्र्यंबकेश्वर येथे गेले होते. दरम्यान, या घटनेनंतर गेल्या दोन दिवसांपासून भुजबळ आणि मराठा क्रांती मोर्चा असे चित्र निर्माण होत असून ते काही मंडळी जाणिवपूर्वक निर्माण करीत असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. शनिवारी (दि.१९) समाजाचे नेते सुनील बागुल यांच्या निवासस्थानी मराठा समाजाच्या सर्व संघटनांच्या प्रमुख पदाधिका-यांची बैठक पार पडली. यावेळी भुजबळ यांच्याशी संपर्क साधण्यात आला असून त्यांची पूर्वनियोजीत वेळ घेऊन चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर राज्यासह केंद्र शासनाकडे बाजू मांडावी यासाठी भूजबळ यांच्याकडे आग्रह धरण्यात येणार आहे.
या बैठकीस समाजाचे नेते करण गायकर, तुषार जगताप, गणेश कदम, चेतन शेलार, राजेश पवार, आशिष हिरे,प्रफुल वाघ, नीलेश शेलार, शरद तुंगार, योगेश गांगुर्डे, तुषार गवळी, किशोर तिडके, शिवा गुंजाळ, नितीन बाळा निगळ, नीलेश मोरे आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादीवादीतील नेते भुजबळ यांच्या पाठीशी राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील मराठा समाजाच्या नेत्यांनी छगन भुजबळ यांच्या
पाठीशी आहेत. मराठा आरक्षणासाठी भुजबळ यांचा पाठींबा होता. तसेच यापुढे देखील कायम राहणार आहे. आरक्षणाची लढाई आता सर्वोच्च न्यायालयात आहे. शासनाव्दारे ही लढाई न्यायालयातून जिंकाण्याचा प्रयत्न समाजाला जिंकायची आहे. भुजबळ यांना लक्ष्य करून आणि वितुष्ट वाढविण्यामुळे समाज मागे पडत आहे. हे समाज बांधवांनी लक्षात घ्यावे असे या नेत्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे. माजी खासदार देवीदास पिंगळे, ज्येष्ठ नेते नाना महाले, जिल्हाध्यक्ष अॅड, रविंद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, निवृत्ती अरिंगळे, माजी आमदार जयंत जाधव यांच्यासह अन्य पदाधिका-यांनी हे पत्रक प्रसिध्दीस दिले आहे.