वाहनांची तोडफोड करणारे मराठा नाही - माणिकराव कोकाटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 05:31 PM2018-08-09T17:31:20+5:302018-08-09T17:33:04+5:30
मराठा समाजाच्या आंदोलनाच्या व्यासपीठावर जातीचा दाखला असलेल्यांनाच प्रवेश दिला जाईल वा देण्यात यावा असे सूतोवाचही माणकिराव कोकाटे यांनी केले आहे
नाशिक : गंगापूर रोडवरील डोंगरे वस्तीगृह मैदानावर सकल मराठा समाजाच्या वतीने आज सकाळी दहा वाजेपासून करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनादरम्यान दहा ते पंधरा अनोळखी युवकांच्या टोळक्याने व्यासपिठावर गोंधळ घालत होते. यावेळी हे टोळके जातीवाचक व अर्वाच्य शब्दांत भाषण करत होते. कायदा सुव्यवस्थेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यावेळी रोखण्याचा प्रयत्न केला यावेळी टोळीतील काहींनी आमच्या कार्यकर्त्यांनी वाहने फोडली. वाहने फोडणारे लोक अनोळखी आहे. हे मराठा समाजाचे कार्यकर्ते नव्हते, असे स्पष्ट मत माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी सुनील बागुल उपस्थित होते.
वाहनांची तोडफोड झाली हे खरे आहे. मी दोन तासांपासून व्यासपिठावर बसलेलो होतो, त्यामुळे मला धक्काबुक्की झाली किंवा ठिय्या आंदोलनातून बाहेर काढण्यात आले असे काहीही नसल्याचे कोकाटे म्हणाले.
दरम्यान यापुढे मराठा समाजाच्या आंदोलनाच्या व्यासपीठावर जातीचा दाखला असलेल्यांनाच प्रवेश दिला जाईल वा देण्यात यावा असे सूतोवाचही माणकिराव कोकाटे यांनी केले आहे.