छगन भुजबळांच्या विरोधात मराठा आंदोलकांची घोषणाबाजी;गाड्यांचा ताफा जाताच गोमूत्र शिंपडले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 12:24 PM2023-11-30T12:24:54+5:302023-11-30T12:49:04+5:30
राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आज येवला दौऱ्यावर आहेत.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आज येवला दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकासनग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्तांना वेगळे पॅकेज द्यावे लागेल, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.
छगन भुजबळांच्या आजच्या या दौऱ्याला मराठा समाजाने विरोध केला आहे. छगन भुजबळ यांना येवला मतदारसंघातील ४६ गावांतील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे. त्यानंतर देखील ज्या ठिकाणी विरोध नाही, त्या ठिकाणी जाऊन छगन भुजबळांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी मराठा आंदोलकांनी काळे झेंडे जोरदार घोषणाबाजी दिली.
छगन भुजबळ यांचा ताफा सोमठाणदेश या गावात नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी दाखल होताच यावेळी येथील गावातील मराठा आंदोलकांनी त्यांच्या दौऱ्याला विरोध करत भुजबळांच्या ताफ्याला आंदोलकांनी पाठ दाखवून, काळे झेंडे देखील दाखवले. गाड्यांचा ताफा ज्यावेळी चालला होता त्यावेळी 'भुजबळ गो बँक', अशी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. तसेच सोमठाणदेश गावातील ज्या मार्गावरून छगन भुजबळ गेले त्या मार्गावर मराठा आंदोलकांनी गोमूत्र शिंपडलं आहे.
नाशिक- मंत्री छगन भुजबळ यांचा ताफा सोमठाण देश या गावात नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी दाखल होताच यावेळी येथील गावातील मराठा आंदोलकांनी त्यांच्या दौऱ्याला विरोध करत भुजबळांच्या ताफ्याला आंदोलकांनी पाठ दाखवून, काळे झेंडे देखील दाखवले. pic.twitter.com/BvHbgjt6yJ
— Lokmat (@lokmat) November 30, 2023