हेमंत गोडसेंवर मराठा आंदोलक संतप्त; खासदारकीचा राजीनामा देण्याची केली मागणी
By संजय पाठक | Published: October 30, 2023 05:45 PM2023-10-30T17:45:59+5:302023-10-30T17:46:22+5:30
उपोषणाला उशिराने भेट दिल्याने नाराजी, मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर नाशिकमध्ये आंदोलन सुरू करण्यात आले आहे
नाशिक- आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने नाशिकच्या छत्रपती शिवाजी स्मारकाजवळ गेल्या ४८ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. आज या आंदोलकांना भेटण्यासाठी गेलेल्या शिंदे गटाचे खासदार हेमंत गेाडसे यांना आंदोलकांनी जाब विचारला आणि समाजासाठी राजीनामा द्या अशी मागणी केली.
मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर नाशिकमध्ये आंदोलन सुरू करण्यात आले आहे. दोन दिवसांपासून आंदोलकांपैकी नाना बच्छाव यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. दिवसेंदिवस नाशिकमध्ये आंदोलन तीव्र होत असून दीडशेहुन अधिक गावांत राजकीय नेते आणि मंत्र्यांना गावबंदी करण्यात आली आहे. उलट समाजाच्या आक्रमक भूमिकेमुळे अनेक मंत्र्यांचे दौरे आणि
कार्यक्रम रद्द होत आहेत.
दरम्यान, आज आंदोलनाच्या ठिकाणी खासदार हेमंत गोडसे भेटण्यासाठी गेल्यानंतर कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. समाजासाठी तुम्ही
खासदारकीचा राजीनामा द्या, तुम्हाला आम्ही पुन्हा निवडून आणू असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनी त्यांची समजूत काढली व शासनच्या वतीने सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. यावेळी नाना बच्छाव, सचीन पवार,संजय देशमुख,ऍड कैलास खांडबहाले,सचिन निमसे,निलेश ठुबे,अण्णा पिंपळे,नितीन डांगे पाटील,विकी गायधनी यासह अनेक मराठा मित्र यावेळी उपस्थित होते