मराठा आरक्षण: नाशिकमध्ये आमरण उपोषण मागे मात्र साखळी उपोषण कायम

By संजय पाठक | Published: November 3, 2023 06:27 PM2023-11-03T18:27:37+5:302023-11-03T18:27:49+5:30

नाशिक-संभाजीनगर मार्गावर बंद करण्यात आलेल्या नाशिक आगाराच्या बसेस पुन्हा धावण्यास सुरुवात झाली.

Maratha reservation: Fast to ends in Nashik but chain hunger strike continues | मराठा आरक्षण: नाशिकमध्ये आमरण उपोषण मागे मात्र साखळी उपोषण कायम

मराठा आरक्षण: नाशिकमध्ये आमरण उपोषण मागे मात्र साखळी उपोषण कायम

नाशिक-आंतरवेल सराटी येथील मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण मागे घेतल्यानंतर नाशिकमध्येही नाना बच्छाव यांचे आमरण उपोषण मागे घेण्यात आले. मात्र साखळी उपाेषण कायम ठेवण्यात आले आहे. वारकऱ्यांच्या हस्ते सरबत घेऊन नाना बच्छाव यांनी उपोषण सोडले.

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी नाशिकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ  गेल्या ५२ दिवसा पासून  साखळी उपोषण व ६ दिवसापासून नाना बच्छाव यांचे आमरण उपोषण सुरू होते. गुरूवारी(दि २) मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुटल्याने त्यांच्या सूचनेनुसार शुक्रवारी (दि.३) नाशिकला वारकरी संप्रदायातील हभप कृष्णा महाराज धोंडगे,हभप पुंडलिक थेटे, हभप रामदास पिंगळे,हभप हरिभाऊ शेलार,पैलवान हिरामण वाघ यांनी नाना बच्छाव यांना सरबत देऊन उपोषण सोडवले.नाशिक: राज्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलनामुळे काही मार्गांवर थांबविण्यात आलेल्या बसेस शुक्रवार (दि.३) पासून पूर्ववत सुरू झाल्या आहेत. त्यानुसार नाशिक-संभाजीनगर मार्गावर बंद करण्यात आलेल्या नाशिक आगाराच्या बसेस पुन्हा धावण्यास सुरुवात झाली. गेल्या २९ ऑक्टोबरपासून या बसेस बंद असल्याने महामंडळाला आर्थिक फटकादेखील सहन करावा लागला.

Web Title: Maratha reservation: Fast to ends in Nashik but chain hunger strike continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.