मराठा हायस्कूलमध्ये मराठी दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:16 AM2021-03-01T04:16:45+5:302021-03-01T04:16:45+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक गुलाबराव भामरे होते. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक रमेश तासकर, पर्यवेक्षक संजय डेर्ले, पुरुषोत्तम थोरात, अंबादास मते उपस्थित ...
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक गुलाबराव भामरे होते. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक रमेश तासकर, पर्यवेक्षक संजय डेर्ले, पुरुषोत्तम थोरात, अंबादास मते उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कवी कुसुमाग्रज व सी.व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यालयातील विद्यार्थिनी मृदुला चित्ते हिने कवी कुसुमाग्रज यांचा जन्म व बालपण या विषयी माहिती तसेच विज्ञान दिनाचे महत्त्व सांगितले तर वरदा देशमुख हिने मराठी भाषा दिनाचे महत्त्व विशद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका पाटील हिने केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक संजय डेर्ले यांनी केले.
फोटो -
===Photopath===
280221\28nsk_9_28022021_13.jpg
===Caption===
नाशिक येथील मराठा हायस्कूल मध्ये मराठी राजभाषा दिन व विज्ञान दिन साजरा करतांना विद्यालयाचे मुख्याध्यापक गुलाबराव भामरे,उपमुख्याध्यापक रमेश तासकर, पर्यवेक्षक संजय डेर्ले,पुरुषोत्तम थोरात, अंबादास मते,व विद्यार्थी आदी.......