कळवण महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 02:14 PM2021-01-29T14:14:46+5:302021-01-29T14:15:00+5:30
कळवण : येथील कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा समारोप कार्यक्रम झाला.
कळवण : येथील कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा समारोप कार्यक्रम झाला. प्रमुख वक्ते माजी प्राचार्य डॉ.सौ.उषा शिंदे यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.बी.एस.पगार होते.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या शिंदे यांनी सांगितले की,भाषा हे दळणवळणाचे साधन असले तरी माणसात माणुसकी व जवळ आणणारे माध्यम आहे. भाषा हे जगण्यासाठी दिशा देणारे शिक्षण असून विद्येचे मंदिर आहे. आपण आपल्या भाषेचा बोट धरून पुढे गेलो व यशस्वी झालो.मराठी भाषा हि आपली आई असून तिच्या संवर्धन व विकासासाठी सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी उपप्राचार्य प्रा.राजेंद्र कापडे, प्रा.एस.एम.पगार, डॉ.एस.जे.पवार,प्रा.व्ही.एम.पगारे उपस्थित होत्या. सूत्रसंचालन प्रा.पूनम वाघेरे यांनी केले तर आभार डॉ.एस.जे.पवार यांनी मानले.