वाघ महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 06:51 PM2021-01-28T18:51:05+5:302021-01-28T18:52:17+5:30
चांदोरी : येथील के. के. वाघ महाविद्यालयात 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. वाय. बी. आहेर उपस्थित होते.
चांदोरी : येथील के. के. वाघ महाविद्यालयात 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. वाय. बी. आहेर उपस्थित होते.
मराठी भाषेला समृद्ध प्राचीन परंपरा असून आज मराठी विश्व साहित्य संमेलनात त्यांचे रुपांतर झाले. तसेच मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसाराची सुरुवात ही खऱ्या अर्थाने संतसाहित्यापासून झाली. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव महाराजांनी प्रचाराचे कोणतेही साधन नसताना वारीची यशस्वी सुरुवात केली.
मराठी भाषेचं महत्व पाश्चिमात्य लोकही जाणतात. वाचन संस्कृती जोपासली तर 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' ऐवजी मराठी भाषेचा गौरव होईल त्यासाठी आपण सर्वांनी सजग राहिले पाहिजे असे प्रतिपादन आहेर यांनी केले.
मराठी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. आर. के. दातीर यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याची वेळ यावी ही खंत आहे. तसेच मराठी भाषेच्या विकासासाठी आपण सर्वांनी दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा जाणीवपूर्वक वापर करावयास हवा असे मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक प्रा. एम. ए. गुंडगळ यांनी केले, पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. एस. व्ही. भंडारे यांनी करून दिला. सूत्रसंचालन विद्यार्थीनी राजश्री गायकवाड, विद्या पगारे यांनी केले, आभार प्रदर्शन प्रा. एस. डी. पगारे यांनी केले.