मराठी भाषिक कौशल्ये विकसित करावी- पृथ्वीराज तौर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:13 AM2021-01-22T04:13:31+5:302021-01-22T04:13:31+5:30
चांदवड : आपल्या भाषिक क्षमतांचा विकास करणे, मराठी भाषिक कौशल्ये विकसित करणे, विविध क्षेत्रातील व्यवसायाच्या संधीची माहिती करून घेणे ...
चांदवड : आपल्या भाषिक क्षमतांचा विकास करणे, मराठी भाषिक कौशल्ये विकसित करणे, विविध क्षेत्रातील व्यवसायाच्या संधीची माहिती करून घेणे आणि मराठी भाषेची व्यवहारातील उपयुक्तता आणि वैशिष्ट्ये यांची ओळख विद्यार्थ्यांना होणे ही आजच्या काळाची गरज आहे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागातील व्यासंगी प्रा.डॉ. पृथ्वीराज तौर यांनी केले.
चांदवड येथील आबड-लोढा-जैन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या आणि मराठी भाषा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत व्याख्यानमालेचे बीजभाषण करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.जी. एच.जैन हे होते. उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र मलोसे यांच्या हस्ते झाले. यावेळी मलोसे यांनी आपण प्रत्यक्ष व्यवहारात कशा प्रकारे मराठी शब्दांच्या ऐवजी इंग्रजी शब्द वापरतो त्याचे उदाहरणासह स्पष्टीकरण केले. पृथ्वीराज तौर यांनी बीजभाषणातून मराठी भाषेची कौशल्य ही व्यवसायाच्या संधी कशा प्रकारे उपलब्ध करून देऊ शकतात याचे विवेचन केले. दररोज निरनिराळ्या प्रश्नांना आणि समस्यांना घेऊन आपल्यासमोर उभे राहत आहे. हे प्रश्न केवळ सामाजिक अथवा आर्थिक नाहीत तर जीवनाच्या सर्वच क्षेत्रांना व्यापणारे असल्याचे ते म्हणाले. अध्यक्षीय मनोगत प्राचार्य डॉ.जी. एच. जैन यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख व संयोजक डॉ. तुषार चांदवडकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. गणेश आहेर यांनी करून दिला. आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ. दत्ता शिंपी यांनी केले. (वा.प्र.) (२१ एमएमजी २)
===Photopath===
210121\21nsk_26_21012021_13.jpg
===Caption===
२१ एमएमजी २