अहिरे विद्यालयात मराठी राजभाषा दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 06:49 PM2021-02-27T18:49:22+5:302021-02-27T18:51:56+5:30

ब्राह्मणगाव : येथील श्रीराम सजन अहिरे विद्यालयात ज्ञानपीठ विजेते कविवर्य कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून उत्साहात साजरा झाला.

Marathi Official Language Day at Ahire Vidyalaya | अहिरे विद्यालयात मराठी राजभाषा दिन

मराठी राजभाषा दिन कार्यक्रमप्रसंगी वि.वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करताना आर.डी. पवार, एच. बागुल व मराठी भाषा विभाग शिक्षक बंधू-भगिनी व विद्यार्थी आदी.

Next

ब्राह्मणगाव : येथील श्रीराम सजन अहिरे विद्यालयात ज्ञानपीठ विजेते कविवर्य कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून उत्साहात साजरा झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक पी.व्ही. चव्हाण, प्राचार्य आर. डी. पवार व शिक्षकांनी शिरवाडकरांच्या प्रतिमेचे पूजन केले.
चंचल शिसोदे हिच्या मराठी प्रतिज्ञेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी पल्लवी डांगळ, नंदिनी परदेशी, दीक्षा खरे, तन्वी अहिरे, मयुरी परदेशी, रूपेश बच्छाव, धनश्री शिसोदे या विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या जीवनकार्य व मराठी भाषेचे महत्त्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले. मराठी विषय शिक्षक के.के. देवरे यांनी वि.वा. शिरवाडकरांच्या जीवन चरित्राविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पी.व्ही. चव्हाण, प्राचार्य आर.डी. पवार यांनीही मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कावेरी येवला व वैभवी बोरसे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मराठी भाषा विभागाचे सर्व शिक्षक बंधू-भगिनी यांनी परिश्रम घेतले.

 

Web Title: Marathi Official Language Day at Ahire Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.