मालेगावसह परिसरात मराठी राजभाषा दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:16 AM2021-03-01T04:16:30+5:302021-03-01T04:16:30+5:30
तिवारी यांनी शिरवाडकरांच्या 'कणा, गाभारा व गर्जा जयजयकार’सह अनेक कविता सादर केल्या. अध्यक्ष कमलाकर देसले यांनीही मार्गदर्शन केले. ...
तिवारी यांनी शिरवाडकरांच्या 'कणा, गाभारा व गर्जा जयजयकार’सह अनेक कविता सादर केल्या. अध्यक्ष कमलाकर देसले यांनीही मार्गदर्शन केले. मंचावर साहित्य संघाचे अध्यक्ष रमेश उचित, मसापचे श्रीकांत बागडे व भास्कर तिवारी होते. प्रास्ताविक उचित यांनी केले. याप्रसंगी कवयित्री उषा बागडे, संतोष कांबळे, चंद्रकांत ठाकरे, संजय निकम, रमेश पवार, सुरेंद्र टिपरे, सचिन लिंगायत यांनी काव्यवाचन केले.
कार्यक्रमास जगदीश वैष्णव, शोभाताई बडवे, विजय भावसार, महाजन, डॉ. सयाजी पगार, मयूर वांद्रे, जिभाऊ अहिरे, प्रकाश पानपाटील, रमेश पाटील, संजय पांडे, भूषण सोनवणे, जयराम माळी, घुमाडे, जगदीश निकम, टी.टी. मोरे, राजेंद्र भामरे, मुकेश वाघ, किरण बर्डे, अजित बागुल, मनोज गोसावी, रवींद्र चंद्रकोर, भूषण पाटील, सुखदेव नागरे, विजय देवरे, रसिक साहित्यिक, वाचक उपस्थित होते. सूत्रसंचालन विवेक पाटील यांनी केले.