स्वामी मुक्तानंद विद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:16 AM2021-03-01T04:16:32+5:302021-03-01T04:16:32+5:30
येवला : शहरातील श्रीगुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी मुक्तानंद माध्यमिक व उच्च विद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात ...
येवला : शहरातील श्रीगुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी मुक्तानंद माध्यमिक व उच्च विद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेला प्राचार्य ए. जी. नाकील यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आली. दहावीचे विद्यार्थी रूद्र पटेल, मनीष भरते, केदार खडके, संस्कृती धुमाळ, स्वाती शिंदे, वैष्णवी परदेशी यांनी विद्यालय, महाविद्यालयातील मराठी विषय अध्यापक अध्यापिका यांचा गुलाबपुपष्प व लेखणी देऊन सन्मान केला. मनीष भरते या विद्यार्थ्यांने कणा हे तात्यासाहेब शिरवाडकर यांचे प्रसिद्ध काव्य सादर केले. सूत्रसंचालन डॉ. प्रसादशास्त्री कुळकर्णी यांनी केले. कार्यक्रमाला डी. आर. नारायणे, एस. एम. पगारे, एम. टी. कदम, एम. डी. परदेशी, जी. आर. गायकवाड, जे. एल. नागपुरे, पी. एस. मुंढे, के. एच. गावडे तसेच उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रा. आरणे, शरद पाडवी, प्रा. सातकर, पर्यवेक्षक सुरेश माळी आदी उपस्थित होते.