Marathi Sahitya Sammelan : आपलं परखड मत समाजापुढं मांडलं की देशद्रोही ठरवलं जातं, जावेद अख्तरांनी व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 21:31 IST2021-12-03T21:30:35+5:302021-12-03T21:31:45+5:30
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan in Nashik : लोकहितवादी मंडळ आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुसुमाग्रजनगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी नाशिक येथे उद्घाटन सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

Marathi Sahitya Sammelan : आपलं परखड मत समाजापुढं मांडलं की देशद्रोही ठरवलं जातं, जावेद अख्तरांनी व्यक्त केली खंत
नाशिक : जो बात कहते डरते है, सब तु वो बात लिख..., जो बात कहते डरते है, सब तु वो बात लिख..., इतनी अंधेरी न थी रात पहले लिख..., असे म्हणत गीतकार, लेखक जावेद अख्तर यांनी लेखकांना निर्भीडपणे लिहिण्यासाठी साद घातली. लोकहितवादी मंडळ आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुसुमाग्रजनगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी नाशिक येथे उद्घाटन सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असलेले जावेद अख्तर म्हणाले की, मराठी साहित्याच्या दरबारात येण्याची संधी मिळाली ही अतिशय आनंदाची बाब असून या मातीला मी प्रणाम करतो. मातृभाषा आपल्याला भूतकाळातून वर्तमानात आनते असे मत देखील त्यांनी यावेळी मांडले.
मी मराठी साहित्य संमेलनात जाण्यास मी योग्य आहे की नाही, हा विचार माझ्या मनात आला. पेशव्यांच्या दरबारात शायरही असायचे. हे मी वाचलं होतं, म्हणून मी आलो. बोलण्याचं माध्यम म्हणजे भाषा. मात्र जगात भाषाच वादाचं कारण झालं आहे. संत साहित्य हे खरे अध्यात्म आहे. संत ज्ञानेश्वर, त्यांचे बंधू यांच्या रचना. संत तुलसीदास यांचे दोहे, हे खरं अभिजात साहित्य आहे, असे जावेद अख्तर यांनी सांगितले.
ते म्हणाले की, लेखक जेव्हा सर्वसामान्य नागरिकाला जागृत करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ही बाब समाजातील काही लोकांना रुचत नाही हे योग्य नाही. आपलं परखड मत समाजापुढे मांडल्यावर पूर्वी काही लोक दोषी मानत होते. आता तर देशद्रोही ठरविले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केले. साहित्य आणि राजकारण याच नातं काय हा प्रश्न नेहमीच उभा राहतो. मात्र साहित्य आणि राजकारण याच घनिष्ठ नातं आहे. घाबरून आयुष्य जगणं योग्य नाही, असेही जावेद अख्तर म्हणाले.
याचबरोबर, पुढे प्रमुख पाहुणे जावेद अख्तर म्हणाले की लोकशाही व्यवस्थेसाठी कुठलाही बंधनात न वावरनारे अतिशय महत्वाचे असुन साहित्यिकांनी राजकारणाच्या दबावाला बळी पडू नये. त्यांनी मुक्तपणे साहित्य लिहावे असे मत त्यांनी व्यक्त केले. कुठल्याही कवि लेखककावर अन्याय होत असेल तर सर्व लेखकांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. जो बात कहते डरते है सब तु वो बात लिख, जो बात कहते डरते है सब, तु वो बात लिख, इतनी अंधेरी न थी रात पहले लिख, असे म्हणत जावेद अख्तर यांनी लेखकांना निर्भीडपणे लिहिण्यासाठी साद घातली.