मॅरेथॉन पुतळ्याचे अनावरण
By admin | Published: June 23, 2016 11:11 PM2016-06-23T23:11:53+5:302016-06-23T23:16:23+5:30
आॅलिम्पिक दिन : कविता राऊत, दत्तू भोकनळ यांना रॅलीतून दिल्या शुभेच्छा
नाशिक : जागतिक आॅलिम्पिक दिनानिमित्त गंगापूररोड येथे मविप्रतर्फे रन तसेच मॅरेथॉन चौक येथे पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या रनमध्ये मविप्र संस्थेतील खेळाडू तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयमार्फत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील खेळाडू आणि प्रशिक्षक यांचा सहभाग होता.
गंगापूररोड येथील मॅरेथॉन चौक ते व्ही. एन. नाईक महाविद्यालयमार्गे पुन्हा मॅरेथॉन चौक असा मार्ग या रनसाठी निश्चित करण्यात आला होता. या एक किमी अंतरावरील रनमध्ये नाशिक जिल्हा स्केटिंग, रोर्इंग, अॅथलेटिक्स, हॉकी, कॅनोर्इंग, हॅण्डबॉल, आर्चरी आदि खेळांतील खेळाडूंचा सहभाग होता. यावेळी आॅलिम्पिक दिनानिमित्त ‘घोषवाक्य’ स्पर्धेचेदेखील आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत होरायझन अकॅडमी (प्रथम), न्यू मराठा हायस्कूल (द्वितीय), जनता विद्यालय, गांधीनगर (तृतीय) यांनी बाजी मारली.
दरम्यान, यावेळी मॅरेथॉन पुतळ्याचे अनावरण तसेच रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या धावपटू कविता राऊत आणि रोर्इंगपटू दत्तू भोकनळ यांनी आॅलिम्पिक स्पर्धेत यश संपादन करावे यासाठी त्यांना प्रातिनिधिक स्वरूपात शुभेच्छा देण्यात आल्या, तसेच गंगापूररोड येथे अशा शुभेच्छांचे फलकदेखील लावण्यात आले होते. खेळाडूंचा उत्साह वाढावा तसेच जिल्ह्यातून अधिकाधिक क्रीडापटू घडावे यासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याची माहिती देण्यात आली. या आॅलिम्पिक रॅलीदरम्यान आॅलिम्पिक गीत धून तसेच स्फू र्ती गीते लावण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, पोलीस उपायुक्त विजय पाटील, नगरसेवक विक्रांत मते, मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार, अॅड. नितीन ठाकरे, प्रा. डॉ. दिलीप धोंडगे यांच्यासह संस्थेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित
होते. (प्रतिनिधी)