हिंगणघाट घटनेच्या निषेधार्थ मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 11:32 PM2020-02-12T23:32:08+5:302020-02-12T23:48:48+5:30
समाजात विकृतांची संख्या दिवसागणिक वाढत असून, अशा नराधमांना फाशीची शिक्षादेखील कमीच आहे. आता जसास तसे उत्तर देण्याची वेळ आली असून, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना जाळण्याचा इशारा संतप्त महिलांनी दिला.
ओझर टाउनशिप : समाजात विकृतांची संख्या दिवसागणिक वाढत असून, अशा नराधमांना फाशीची शिक्षादेखील कमीच आहे. आता जसास तसे उत्तर देण्याची वेळ आली असून, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना जाळण्याचा इशारा संतप्त महिलांनी दिला.
हिंगणघाट प्रकरणात पीडित प्राध्यापिकेच्या मृत्यूनंतर आरोपीला तत्काळ शिक्षा व्हावी, या मागणीसाठी ओझरकरांनी निषेध मोर्चा काढला. यावेळी महिलांनी संतप्त प्रतिक्रिया देत या घटनेचा निषेध केला. निषेध सभेत कांचन हुजरे, सरपंच जान्हवी कदम, डॉ. मेघा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर हिंगणघाट येथील पीडितेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी रूपाली अक्कर, तेजस्विनी अक्कर, अर्चना चांडक, लीना तांबट, कांचन कोळपकर, पूनम लढ्ढा, विश्वलता पशार, स्मिता तांबट, सुलभा तांबट, अंजली कोळपकर, सविता पवार, रजनी अक्कर, सुजाता शेटे, यामिनी वानखेडे, पूजा वडनेरे, चंद्रकला जाधव, मंगला तांबट, स्वाती जाधव, सुवर्णा बुरकुले, स्वाती तांबट, माधुरी तांबट आदी उपस्थित होत्या.
समाजमाध्यमांवर संतप्त प्रतिक्रिया
हिंगणघाट येथील घटनेच्या निषेधार्थ राज्यभरातून संतापजनक प्रतिक्रि या उमटत आहेत. या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी तसेच हैदराबादप्रमाणे संबंधित आरोपीला गोळ्या घालाव्यात अशा स्वरूपात राज्यभरातून समाजमाध्यमांवर मते व्यक्त केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर ओझर परिसरातील नागरिकांनी निषेध मोर्चा काढला.