झेंडूची फुले एक रु पया किलो
By admin | Published: October 31, 2016 01:01 AM2016-10-31T01:01:25+5:302016-10-31T01:11:45+5:30
झेंडूची फुले एक रु पया किलो
Next
पांडाणे : या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने झेंडूच्या फुलांचे उत्पादन वाढल्याने झेंडू एक रूपया किलो भावाने विकला गेला. यंदा कांदा, टमाटा यासह दिवाळी सणानिमित्त झेंडूची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. परंतु ऐन दिवाळीत पिकाला योग्य भाव मिळेनासा झाला आहे. टमाट्याला प्रति के्रट कवडीमोल भाव मिळत आहे, तर झेंडू फुलाला बाजारात प्रति क्रेट वीस रुपये भाव मिळत असल्यामुळे एक रुपया किलो भावाने फुले विकण्यापेक्षा हार बनवून विक्री करण्याचे शेतकऱ्यांनी पसंत केले आहे. (वार्ताहर)