विवाहितेची आत्महत्या; पतीसह दोघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 11:45 PM2020-02-25T23:45:45+5:302020-02-26T00:10:54+5:30
सासरच्या जाचाला कंटाळून बत्तीस वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.२५) सकाळी ७ वाजेच्या सुमारास बागलाण तालुक्यातील अजमीर सौंदाणे येथे घडली. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी ८ जणांविरु द्ध हुंडाबळी तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पतीसह दोघांना ताब्यात घेतले आहे.
सटाणा : सासरच्या जाचाला कंटाळून बत्तीस वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.२५) सकाळी ७ वाजेच्या सुमारास बागलाण तालुक्यातील अजमीर सौंदाणे येथे घडली. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी ८ जणांविरु द्ध हुंडाबळी तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पतीसह दोघांना ताब्यात घेतले आहे.
विवाहितेचा भाऊ नामदेव पांडुरंग सोळुंखे (रा. कोठरे, ता. मालेगाव) यांनी दिलेल्या तक्र ारीत म्हटले आहे की दि. १० मार्च २००४ रोजी बहीण सुमित्रा हिचा विवाह अजमीर सौंदाणे येथील मुकुंद विजय पवार याच्याशी झाला होता. लग्नात माहेरच्यांनी केलेल्या सोन्याचे दागिने घेऊन ये यासाठी पती मुकुंद पवार, आजी सासू सुलाबाई पवार, चुलत दीर भाऊसाहेब पवार, नणंद मीनाबाई दीपक महाले, नंदई दीपक जगन्नाथ महाले (रा. रावळगाव), नणंद ज्योती मोरकर, नंदई गोकुळ मोरकर (दोघे राहणार कौतिकपाडे) यांनी संगनमत करून तगादा लावला होता. मात्र, सुमित्राने दागिने न दिल्याने तिचा शारीरिक छळ सुरु केला होता.
या छळाला कंटाळून सुमित्राने अजमिर सौंदाणे येथील स्वत:च्या शेतात उडी घेऊन आत्महत्या केली. दरम्यान सकाळी ७ वाजेच्या सुमारास सुमित्राचा मृतदेह विहीरीत तरंगतांना आढळून आला. सासरच्यांनी पोलिसांच्या मदतीने विहिरीतून मृतदेह काढून येथील ग्रामीण रु ग्णालयात पाठविला. सुमित्राच्या माहेरच्या मंडळीने जोपर्यंत पोलीस गुन्हा दाखल करत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतल्याने ग्रामीण रु ग्णालयात गर्दी होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस उपअधीक्षक शशिकांत शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांनी नातेवाइकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र नातेवाइकांनी गोंधळ घातल्याने फिर्यादीने दिलेल्या तक्र ारी वरून आठ जणांविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.