सटाण्यातील बाजारपेठ परिसर अस्वच्छतेच्या भोवऱ्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:15 AM2021-07-31T04:15:14+5:302021-07-31T04:15:14+5:30
शहरातील अहिल्यादेवी चौक, डॉ. भुतेकर गल्ली, डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, सिद्धार्थनगर, मुल्ला वाडा, मंगलनगर परिसरात संपूर्ण शहराचे सांडपाणी या भागात ...
शहरातील अहिल्यादेवी चौक, डॉ. भुतेकर गल्ली, डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, सिद्धार्थनगर, मुल्ला वाडा, मंगलनगर परिसरात संपूर्ण शहराचे सांडपाणी या भागात सोडल्याने दुर्गंधी पसरून चिकुन गुन्या, डेंग्यूसारख्या साथीच्या रोगाची लागण झाली आहे. यासाठी परिसरात दिवसातून किमान एकदातरी जंतुनाशक फवारणी करून नागरिकांची काळजी घ्यावी या उद्देशाने शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रवक्ते प्रा. अमोल बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सटाणा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता ढगळे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष शेखर बच्छाव, तालुका महासचिव दादासाहेब खरे, माजी तालुकाध्यक्ष चेतन वनिस, युवा शहराध्यक्ष जितेंद्र सरदार, दीपक बच्छाव, पंकज खरे, नाना बच्छाव, अंकुश बच्छाव, राहुल बच्छाव, साजन बाविस्कर, अतुल शेजवळ आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
इन्फो...
एक शौचालय पूर्णपणे पाडण्यात आले असून, एकाची पडझड झाली आहे. पाडलेल्या शौचालयाचा ढिगारा तसाच पडून आहे. त्याठिकाणी डुकरे, मोकाट कुत्री फिरत असतात. शौचालयाचे मलमूत्र बाहेर येऊन दुर्गंधी पसरली आहे. लहान लहान मुले इथे खेळत असतात. त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. तसेच डॉ. आंबेडकर पुतळ्यासमोर अनेक कार्यक्रम होत असतात. यावेळी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमत असतो. अशा संवेदनशील जागेच्या समोर खुली गटार असून, काल त्यात एक मुके जनावर मृत्युमुखी पडले. अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी व जी खुली गटार आहे त्यावर लोखंडी सुरक्षा जाळी बसवावी, असे निवेदनात म्हटले आहे.
फोटो - ३० सटाणा ४
सटाणा शहरातील अस्वच्छतेबाबत मुख्याधिकारी हेमलता ढगळे यांना निवेदन मुख्याधिकारी हेमलता ढगळे यांना निवेदन देताना शेखर बच्छाव, दादासाहेब खरे, चेतन वनिस, जितेंद्र सरदार, दीपक बच्छाव, पंकज खरे आदी.
300721\30nsk_22_30072021_13.jpg
सटाणा शहरातील अस्वच्छतेबाबत मुख्याधिकारी हेमलता ढगळे यांना निवेदनमुख्याधिकारी हेमलता ढगळे यांना निवेदन देताना शेखर बच्छाव, दादासाहेब खरे, चेतन वनिस, जितेंद्र सरदार, दीपक बच्छाव, पंकज खरे आदी