पालेभाज्यांचे बाजारभाव तेजीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 11:02 PM2018-07-08T23:02:24+5:302018-07-09T00:09:19+5:30
पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या पालेभाज्यांचे दर तेजीत असून, लिलावात कांदापात, मेथी, शेपू तसेच कोथिंबीर या पालेभाज्या मालाला चांगला बाजारभाव मिळाला. कांदापात मालाची आवक कमी आल्याने बाजारभाव तेजीत आला.
Next

गेल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली यामुळे शेतातील कांदापात पीक धोक्यात आल्याने काहीशी घटली आहे. शनिवारी सायंकाळी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदापात मालाची अत्यंत कमी प्रमाणात आवक आल्याने बाजारभाव तेजीत आले प्रति जुडी ४७ रु पये दराने शेतकºयांना बाजारभाव मिळाल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे.