पालेभाज्यांची आवक घटल्याने नाशिकमध्ये बजारभाव तेजीत

By श्याम बागुल | Published: September 13, 2018 03:10 PM2018-09-13T15:10:13+5:302018-09-13T15:12:41+5:30

कृषी उत्पन्न बाजारसमितीत गेल्या आठवड्यापासून शेपू, मेथी, कोथिंबीर, पालक तसेच कांदापात या पालेभाज्यांची आवक काही प्रमाणात घटलेली आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत यंदा ब-यापैकी पाऊस झाला तर काही तालुक्यात अजूनही समाधानकारक पर्जन्यवृष्टी न झाल्याने शेतातील पिकांना पाणी कमी

Market capitalization in Nashik has improved due to the fall in the incomes of the private sector | पालेभाज्यांची आवक घटल्याने नाशिकमध्ये बजारभाव तेजीत

पालेभाज्यांची आवक घटल्याने नाशिकमध्ये बजारभाव तेजीत

Next
ठळक मुद्देपावसाचा परिणाम : शेतमालाचे उत्पादन घटले शेतातील पिकांना पाणी कमी पडत असून त्याचा परिणाम उत्पादनावर

नाशिक: गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने त्याचा परिणाम शेतमालाच्या उत्पादनावर जाणवला आहे शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडत असल्याने बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या मेथी, कोथिंबीरसह अन्य सर्वच पालेभाज्यांची आवक घटल्याने बाजारभाव तेजीत आले आहे. गुरूवारी नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत विक्रीसाठी आलेल्या कोथिंबीर जुडीला ५० रुपये तर मेथीला २५ रुपये असा बाजारभाव मिळाल्याने बळीराजाने समाधान व्यक्त केले आहे.
कृषी उत्पन्न बाजारसमितीत गेल्या आठवड्यापासून शेपू, मेथी, कोथिंबीर, पालक तसेच कांदापात या पालेभाज्यांची आवक काही प्रमाणात घटलेली आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत यंदा ब-यापैकी पाऊस झाला तर काही तालुक्यात अजूनही समाधानकारक पर्जन्यवृष्टी न झाल्याने शेतातील पिकांना पाणी कमी पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुर्णपणे उघडीप दिलेली आहे. पावसाने उघडीप दिल्याने शेतातील पिकांना पाणी कमी पडत असून त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. शेतमालाची आवक घटल्याने त्याचा परिणाम सर्वच प्रकारच्या पालेभाज्या बाजारभावावर झाला आहे परिणामी बाजारभाव तेजीत आलेले आहेत मागील दोन-तीन दिवसांपूर्वी कोथंबीर प्रति जुडीला ८० रुपये पर्यंत बाजार भाव मिळालेला होता. गुरूवारी सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबीर ५० रुपये, कांदापात २५, मेथी २५ तर शेपू १५ रुपये प्रति जुडी दराने विक्री झाल्याचे व्यापा-यांनी सांगितले.

 

Web Title: Market capitalization in Nashik has improved due to the fall in the incomes of the private sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.