नाशिक कृउबात बाजार सेस वसुलीचा तिढा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:16 PM2020-12-08T16:16:16+5:302020-12-08T16:19:08+5:30

नाशिक- पंचवटीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेस संदर्भात तिढा कायम असून आता याबाबत बाजार समितीने घेतलेल्या निर्णय हे नियमानुसारच असल्याचा हवाला देत जिल्हा उपनिबंधकांनी व्यापाऱ्यांना संचालकांबरोबरच संयुक्त बैठक घेण्याचे आदेशीत करून त्यांच्याच कोर्टांत चेंडु टोलावला आहे. दरम्यान, त्यांच्या पत्राचा संदर्भ घेऊन संयुक्त बैठकीसाठी पत्र देण्याचा निर्णय व्यापारी संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला.

Market cess recovery in Nashik Kruubat remains sharp | नाशिक कृउबात बाजार सेस वसुलीचा तिढा कायम

नाशिक कृउबात बाजार सेस वसुलीचा तिढा कायम

Next
ठळक मुद्देव्यापाऱ्यांचे सभापतींना पत्र संयुक्त बैठक घेण्याची मागणी

नाशिक- पंचवटीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेस संदर्भात तिढा कायम असून आता याबाबत बाजार समितीने घेतलेल्या निर्णय हे नियमानुसारच असल्याचा हवाला देत जिल्हा उपनिबंधकांनी व्यापाऱ्यांना संचालकांबरोबरच संयुक्त बैठक घेण्याचे आदेशीत करून त्यांच्याच कोर्टांत चेंडु टोलावला आहे. दरम्यान, त्यांच्या पत्राचा संदर्भ घेऊन संयुक्त बैठकीसाठी पत्र देण्याचा निर्णय व्यापारी संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सुरू असलेल्या सेस वसुलीवरून व्यापारी आणि बाजार समितीत वाद सुरू आहेत. बाजार समितीच्या आवारातील व्यापाऱ्यांकडून तीस हजार रूपये घेऊनही बाहेरून येणाऱ्या मालापोटी ट्रक चालकांना मालाच्या किंमतीच्या एक टक्का सेस भरावा लागत असून त्यामुळे आता बाजार समितीत माल येणेच बंद करण्यात आले आहे त्यासंदर्भात नाशिक धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांनी जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना पत्र दिले होते. त्याला सोमवारी (दि.७) खरे यांनी प्रत्युत्तर दिले असून पणन संचालकांनी बाजार समित्यांची वसुली वैध कशी ठरवली याबाबतचे अनेक संदर्भ दिले आहेत.

१६ ऑक्टोबर २०२० राजी बाजार समितीने सर्वसाधारण सभेत घेतलेल्या ठरावानुसार अनियंत्रीत मालावर एक टक्का प्रमाणे सेवा शुल्क वसुली करण्याचा निर्णय कसा घेण्यात आला ते मांडतानाच सध्या नियमनमुक्तीमुळे बाजार समित्यांवर विपरीत परीणाम झाल्याचे नमुद केले आहे आणि मागणीवर कोणतेही आदेश न देता व्यापाऱ्यांना पुन्हा बाजार समिती व्यवस्थापन आणि व्यापारी प्रतिनिधी यांची संयुक्त सभा घेऊन तोडगा काढावा असे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने व्यापाऱ्यांची बैठक झाली. या वेळी बाजार समिती सभापतींना पत्र देण्याचे ठरवण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे राजेश मालपुरे, मनोज वडेरा, राकेश भंडारी व प्रमोद छाजेड यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

Web Title: Market cess recovery in Nashik Kruubat remains sharp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.