सिडको परिसरातील मार्केट बनले गुन्हेगारांचा अड्डा; पोलिसांचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 10:03 PM2020-06-24T22:03:06+5:302020-06-24T22:06:38+5:30
सिडको : येथील पंडितनगर भागात असलेल्या संत गाडगे महाराज मार्केट गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारांचा अड्डाच बनला असून, मासळी मार्केटमध्ये तर गुन्हेगारांचा अनधिकृत बियर बार तर गर्दुल्यांसाठी अड्डाच तयार झाला आहे. या ठिकाणी नशा करणाऱ्या गुन्हेगारांकडून महिलांची अडवणूक व छेडछाड होत असल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी त्यावर कारवाई करण्याची माागणी नागरिकांनी केली आहे.
लोकमत न्युज नेटवर्क

सिडकोतील प्रभाग क्रमांक २९ मधील पंडितनगर येथे गेल्या काही वर्षांपासून मासळी मार्केट उभारण्यात आले आहे. मच्छी विक्रेत्यांबरोबरच इतरही काही व्यवसाय येथे सुरू असतात. मासे खरेदीसाठी सायंकाळी या ठिकाणी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. सायंकाळनंतर अंधार पडल्यास या मार्केटचा ताबा मद्यपी व गांजा ओढणारे टवाळखोर घेत असून, त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. रात्री उशिरापर्यंत येथे नशेबाजांचा धिंगाणा सुरू असतो. काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी गांज्याच्या नशेत असलेल्या एका युवकाने महिलेला अडवून तिच्या गळ्यातील सोन्याची माळ ओढण्याचा प्रयत्न केला. सदर महिलेने आरडाओरड केल्याने त्या टवाळखोराने पलायन केले.पंडितनगर येथील संत गाडगे महाराज भाजी मार्केट व शेजारीच असलेल्या मासे मार्केटमध्ये मद्यपी व गांजा ओढणाऱ्यांचा त्रास नित्याचाच झाला असून, पोलिसांनी वेळीच लक्ष दिले नाही तर या ठिकाणी मोठी घटना घडू शकते.
- विठ्ठल विभुते, अध्यक्ष, पंडितनगर भाजी मार्केट