बाजार बंदचा कांदा आवकीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:11 AM2021-06-28T04:11:12+5:302021-06-28T04:11:12+5:30

मे महिन्यात कांद्याला कोरोनाचा फटका बसला. सातत्याने बाजार बंद राहिला. त्यामुळे आवारावर कांदा आवक कमी झाली. भाव मात्र टिकून ...

Market closure affects onion income | बाजार बंदचा कांदा आवकीवर परिणाम

बाजार बंदचा कांदा आवकीवर परिणाम

Next

मे महिन्यात कांद्याला कोरोनाचा फटका बसला. सातत्याने बाजार बंद राहिला. त्यामुळे आवारावर कांदा आवक कमी झाली. भाव मात्र टिकून राहिले. खरीप हंगाम सुरू झाला असला तरी नवीन कांदे नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये येतील. तोपर्यंत साठवून ठेवलेला उन्हाळ कांदा बाजारात येत राहील. सद्य:स्थितीत कांद्याला देशांतर्गत व परदेशातही मागणी वाढलेली दिसून येत असल्याने बाजारभाव टिकून असल्याचे दिसून येत आहे. पुढे आवक कमी झाल्यास बाजारभावात वाढ होऊ शकते.

जूनच्या प्रारंभी कमी असणारे बाजारभाव शेवटच्या आठवड्यात मात्र वाढल्याचे दिसून आले. कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, राजस्थान, पश्‍चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आदी राज्यांसह परदेशातही मागणी सर्वसाधारण राहिली. मे महिन्यात बाजार समितीच्या मुख्य आवारावर १ लाख ४३ हजार ६९९ क्विंटल कांदा आवक झाली, तर अंदरसुल उपबाजार आवारावर ६९ हजार ८७७ क्विंटल कांदा आवक झाली. बाजारभाव किमान २५० ते कमाल रुपये १८५१ तर सरासरी १२०० रुपये राहिले.

चालू महिन्यात बाजार समिती साप्ताहिक सुटी, आठवडी बाजार सुटी, अमावास्या, व्यापारी अर्ज आदी कारणाने साधारणत: दहा दिवस बंदच राहिली. महिन्याच्या प्रारंभी कांद्याचे भाव किमान ३०० ते कमाल १९५० तर सरासरी १६५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. यात दर दोन दिवसांनी बाजारभाव कमी झाल्याचे दोन आठवडे दिसून आले, तर तिसऱ्या आठवड्यात स्थिर राहिलेल्या बाजारभावात थोडी सुधारणा झाली. शेवटच्या आठवड्यात बाजारभावात वाढ झाल्याचे दिसून आले. जूनमध्ये बाजार समितीच्या मुख्य आवारावर २ लाख क्विंटल कांदा आवक झाली, तर अंदरसुल उपबाजार आवारावर १ लाख १५ हजार कांदा आवक झाली. बाजारभाव किमान २०० ते कमाल २१७० तर सरासरी १६५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत राहिले. कांद्यातून चालू महिन्यात सुमारे ५० कोटी ४० लाख रुपयांची उलाढाल झाली आहे.

इन्फो गत सप्ताहात ५५ हजार क्विंटल आवक

जूनच्या शेवटच्या सप्ताहाचा विचार करता बाजार आवारावर उन्हाळ कांदा आवक टिकून राहिली, तर बाजारभावात थोडीशी सुधारणा झाल्याचे दिसून आले. सप्ताहात एकूण कांदा आवक ५५ हजार ३२१ क्विंटल झाली. उन्हाळ कांद्यास बाजारभाव किमान ४०० ते कमाल २१७० तर सरासरी १७५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. अंदरसुल उपबाजार आवारावर कांद्याची एकूण आवक ३५ हजार ९७९ क्विंटल झाली. उन्हाळ कांद्यास बाजारभाव किमान ३०० ते कमाल २१४२, तर सरासरी १७०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते.

देशभर उन्हाळ कांदा होतो. त्याबरोबरच आता कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजराथ, राजस्थान आदी राज्यातही लाल कांदा होऊ लागला आहे. वातावरणातील बदल आणि पावसाचा परिणाम याचा कांद्याला फटका बसतो. परिणामी बाजारभावही कमी-अधिक होत असतात.

Web Title: Market closure affects onion income

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.