बाजार समितीचे प्रवेशद्वार पुन्हा खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 01:25 AM2019-01-11T01:25:26+5:302019-01-11T01:26:44+5:30
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे दक्षिण बाजूकडील आठवडाभरापूर्वी बंद केलेले प्रवेशद्वार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यापुढे बाजार समिती प्रवेशद्वाराबाहेर कोणतेही प्रकारचे अतिक्रमण होऊ देऊ नये तसेच सदरचा रस्ता केवळ शेतकºयांची वाहने ये-जा करण्यासाठी खुला ठेवावा, अशी अट घालण्यात आली आहे.
पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे दक्षिण बाजूकडील आठवडाभरापूर्वी बंद केलेले प्रवेशद्वार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यापुढे बाजार समिती प्रवेशद्वाराबाहेर कोणतेही प्रकारचे अतिक्रमण होऊ देऊ नये तसेच सदरचा रस्ता केवळ शेतकºयांची वाहने ये-जा करण्यासाठी खुला ठेवावा, अशी अट घालण्यात आली आहे.
यापूर्वी बाजार समितीने पेठरोडकडचे प्रवेशद्वार सुरक्षिततेच्या दृष्टीने काही वर्षांपूर्वीच बंद केले होते. त्यानंतर गेल्या आठवड्यात दक्षिण दरवाजा परिसरातील वाढते अतिक्रमण, वाहतूक कोंडी तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्पुरत्या स्वरूपात प्रवेशद्वार बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
प्रवेशद्वार बंद करण्याचा निर्णय घेतल्याने व्यापाºयांनी नाराजी व्यक्त करत बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंबळे यांची भेट घेतली होती. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत दिंडोरीरोड आणि हॉटेल उत्तम हिरा येथून जाणारा रस्ता असे दोन रस्ते भाजीपाला वाहतुकीसाठी आहेत.
पूर्वी तीन रस्ते होते त्यापैकी पेठरोडकडून बाजार समितीत येणाºया रस्त्यावर शेतकºयांचा माल चोरी होणे, शेतकºयांना दमदाटी करून रोकड चोरणे व मारहाण करून धमकी देणे असे गुन्हेगारीचे प्रकार घडायचे. सतत घडणाºया प्रकारामुळे बाजार समितीने सुरक्षितता म्हणून प्रवेशद्वार बंद करावे लागेल, अशी ठाम भूमिका घेतली होती.
हॉटेल उत्तम हिरा येथून बाजार समितीत जाणाºया रस्त्यावर हॉटेल्स, चहा टपरी, बियाणे तसेच शेतीची अवजारे विक्रीची अनेक दुकाने आहेत. या दुकानांसमोर काही वर्षांपासून कांदा, बटाटा विक्रेते व अन्य व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते.
या रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटवावे, अशी मागणी चुंबळे यांनी अनेकदा मनपाकडे लेखीस्वरूपात केली होती. मात्र मनपाने दखल न घेतल्याने वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि अतिक्रमणावर लगाम बसावा, शेतकºयांची लूटमार होऊ नये या सुरक्षिततेच्या दृष्टीने गेल्या आठवड्यात बॅरिकेड्स टाकून सुरक्षारक्षक नेमून प्रवेशद्वार बंद केले होते.