बाजार समितीत भाजीपाला आवक घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:14 AM2021-04-20T04:14:46+5:302021-04-20T04:14:46+5:30
कृषी उत्पन्न बाजार समितीत जिल्ह्यातील शेतकरी शेतमाल विक्रीसाठी आणतात, मात्र गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागातदेखील कोरोनाने शिरकाव केल्याने खेड्यापाड्यात ...
कृषी उत्पन्न बाजार समितीत जिल्ह्यातील शेतकरी शेतमाल विक्रीसाठी आणतात, मात्र गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागातदेखील कोरोनाने शिरकाव केल्याने खेड्यापाड्यात बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. परिणामी खेड्यापाड्यातून येणारे शेतकरी भयभीत झाल्याने त्याचा परिणाम बाजार समितीत दाखल होणाऱ्या शेतमालावर झाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला खरेदी-विक्रीच्या माध्यमातून दैनंदिन कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोना प्रादुर्भाव पुन्हा वाढत चालल्याने त्याचा परिणाम दैनंदिन उलढालीवर झाला आहे. गत १० ते १५ दिवसांपासून बाजार समितीत ३५ ते ४० टक्के शेतमाल आवक घटली आहे.
इन्फो बॉक्स====
बळीराजा अडचणीत
कोरोना संसर्ग वाढत चालल्याने शासनाने १५ दिवस निर्बंध लागू केले आहेत. बाजार समितीत येणाऱ्या सर्व शेतकरी, व्यापारी वर्गाने काय काळजी घ्यावी याबाबत वारंवार सूचना दिल्या जात आहेत. तसेच व्यवहार करताना सुरक्षित अंतराचे पालन केले जात असून, विनाकारण फिरणाऱ्यांना प्रवेशबंदी केली आहे. ग्रामीण भागातील रुग्ण वाढत असल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. रोजची शेतमाल आवक कमी झाल्याने बळीराजा पुन्हा कोरोना संकटामुळे अडचणीत सापडला आहे.
-देवीदास पिंगळे, सभापती बाजार समिती, नाशिक