बाजार समिती सचिवास लाच घेताना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 12:54 AM2017-10-28T00:54:10+5:302017-10-28T00:54:17+5:30

 Market Committee Secretariat arrested for accepting bribe | बाजार समिती सचिवास लाच घेताना अटक

बाजार समिती सचिवास लाच घेताना अटक

Next

नाशिक : चांदवड बाजार समितीच्या इमारतीचे वॉटर प्रूफिंग कामाचे प्रमाणपत्र देण्यासाठी ठेकेदाराकडे चोवीस हजार रुपयांची मागणी करून रक्कम घेताना बाजार समितीचे सचिव गोरक्षनाथ निवृत्ती गांगुर्डे (३८, रा. दिघवद, ता. चांदवड, नाशिक) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि़ २७) रंगेहाथ पकडले़
अधीक्षक पंजाबराव उगले यांनी दिलेल्या माहितीनुसार येवला तालुक्यातील अनकाई येथील ठेकेदाराने चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीचे वॉटर प्रुफिंगचे काम केले होते़ या कामाचा ५९ हजार २४१ रुपयांचा धनादेश दिल्याबद्दल तसेच काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी बाजार समितीचे सचिव गांगुर्डे यांनी गुरुवारी (दि़२६) २४ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती़ याबाबत ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती़  ठेकेदाराच्या तक्रारीनुसार शुक्रवारी (दि़२७) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सापळा रचण्यात आला होता़ सकाळी ११ वाजेच्या सुमारास ठेकेदाराकडून सचिव गांगुर्डे यांनी २४ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच अधिकाºयांनी रंगेहाथ पकडले़ या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़
 

Web Title:  Market Committee Secretariat arrested for accepting bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.