सात दिवसांनी बाजारसमिती सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 06:32 PM2021-04-05T18:32:33+5:302021-04-05T18:39:14+5:30

पिंपळगाव बसवंत : गेल्या सात दिवसांपासून बंद असलेले पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव आजपासून पुन्हा सुरू झाले आहेत. सोमवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याचे तब्बल ६८१ ट्रॅक्टर व २३१ पिकप तर उन्हाळ कांद्याची २७६ ट्रॅक्टर आवक झाली आहे. त्यास जास्तीतजास्त १२५२ रुपये प्रति किंटल भाव जाहीर झाला. मात्र मागील आठवढ्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात घसरण दिसून आली.

The market committee started after seven days | सात दिवसांनी बाजारसमिती सुरू

वर्षा अखेर नंतर पिंपळगाव बाजार समितीत भरलेला कांदा लिलाव.

Next
ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : कांद्याच्या दरात कमालीची घसरण

पिंपळगाव बसवंत : गेल्या सात दिवसांपासून बंद असलेले पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव आजपासून पुन्हा सुरू झाले आहेत. सोमवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याचे तब्बल ६८१ ट्रॅक्टर व २३१ पिकप तर उन्हाळ कांद्याची २७६ ट्रॅक्टर आवक झाली आहे. त्यास जास्तीतजास्त १२५२ रुपये प्रति किंटल भाव जाहीर झाला. मात्र मागील आठवढ्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात घसरण दिसून आली.

साप्ताहिक सुट्या, सण व वर्षा अखेर आदींमुळे कांदा लिलाव प्रक्रिया सात दिवस बंद होती. त्यामुळे सोमवारी (दि.५) लाल कांद्याची ट्रॅक्टर पिकप वाहनांमधून आवक झाली, त्यास कमीतकमी ७०० सरासरी ८५१ तर जास्तीत जास्त १००२ रुपये किंटल भाव जाहीर झाला. तर व उन्हाळ कांद्याची ट्रॅक्टर पिकप वाहन मधून क्विंटल आवक झाली त्यास कमीतकमी ७५१ सरासरी १०५० तर जास्तीत जास्त १२५२ रुपये किंटल भाव जाहीर झाला मागील सात दिवसांचा आलेख बघता भावात १०२ रुपयांची घसरण झाली असून कांद्याचे दर दिवसेंदिवस कमी होतांना दिसत आहेत.
कोरोनाचा कहर वाढल्याने व लॉक डाऊनच्या भीतीने हॉटेल व्यवसायिकांनी देखील कांद्याच्या मागणीत कमालीची घट केली आहे. त्यामुळे कांद्याचे दर सद्याच्या परिस्थितीत हजार रुपयांच्या आत असून अजून कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे.

मागील आठवड्यात
दिनांक २६ मार्च
लालकांदा
कमीतकमी जास्तीजास्त सरासरी
७०१ ११३२ ९५१
उन्हाळ कांदा
८०० १४३३ ११५१
.......दि २७ मार्च........
लाल कांदा
७५१ ११६० ९५१
उन्हाळ कांदा
८०० १३११ ११५१
बंद नंतर चालू आठवडा
सोमवार दि ५ एप्रिल
लाल कांदा
७०० १००१ ८००
उन्हाळ कांदा
७५१ १२५२ १०००
 
Web Title: The market committee started after seven days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.