जिल्ह्यातील बाजार समित्या तीन दिवस बंद
By admin | Published: December 11, 2015 11:29 PM2015-12-11T23:29:30+5:302015-12-11T23:33:26+5:30
जिल्ह्यातील बाजार समित्या तीन दिवस बंद
निर्यातमूल्य घटले, तरी परिणाम सोमवारीचनाशिक : कांद्याचे निर्यातमूल्य केंद्र सरकारने सातशेवरून चारशेवरून आणल्याने त्याचा थेट फायदा किंवा परिणाम हे सोमवारनंतरच (दि. १४) प्रत्यक्षात दिसणार असून, तूर्तास तीन दिवस कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद असल्याने कांदा उत्पादकांना सोमवारपर्यंत कांद्याच्या भावाबाबत प्रतीक्षा करावी लागेल.
कांदा निर्यातमूल्य सातशे डॉलरवरून तीनशे डॉलने घटवून चारशे डॉलरपर्यंत कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने गुरुवारी (दि.१०) सायंकाळी घेतला. त्यामुळे त्याचा थेट परिणाम शुक्रवारी (दि.११) कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कामकाजावर जाणवण्याची चिन्हे असली तरी काल कार्तिकी अमावस्या असल्याने बहुतांश कांदा लिलाव बंदच होते. तसेच शनिवारी (दि.१२) दुसरा शनिवार व रविवार जोडून आल्याने आता कांदा निर्यातमूल्य कमी केल्याचे परिणाम प्रत्यक्षात सोमवारी (दि.१४) जेव्हा कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज सुरू होईल, तेव्हाच जाणवण्याची चिन्हे आहेत. कांदा निर्यातमूल्य कमी केल्याने मात्र कांदा भाव स्थिर राहण्यास मदतच होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.(प्रतिनिधी)
सोेमवारीच परिस्थिती समजणार
सलग तीन दिवस कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज बंद राहणार असल्याने कांदा निर्यातमूल्य कमी केल्याने त्याचे थेट परिणाम सोमवारीच (दि.१४) दिसून येतील. सोमवारी कांदा आवक वाढली तरी कांद्याचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. मात्र निर्यातमूल्य कमी केल्याचा परिणाम सोमवारनंतरच दिसून येईल.
नानासाहेब पाटील - नाफेड संचालक