बाजारपेठ सजली

By admin | Published: August 27, 2016 11:53 PM2016-08-27T23:53:39+5:302016-08-27T23:53:48+5:30

वेध गणरायांचे : गणेशमूर्तींना मोतीकलेचा साज

Market dressed | बाजारपेठ सजली

बाजारपेठ सजली

Next

नाशिक : लाल बागचा राजा, टिटवाळ्याचा गणपती, पुणेरी पगडीतील गणपती, बाल गणेश, बाजीराव गणपती, अशा अनेकविध गणेशमूर्तींनी शहराची बाजारपेठ सजली आहे.
गणेशोत्सोवाला बोटावर मोजण्याइतके दिवस शिल्लक राहिले असून गणेशमूर्ती विक्रीची दुकाने थाटण्यास सुरुवात झाली आहे. डोंगरे वसतीगृह मैदान, इदगाह मैदानावर गणेशमूर्ती विक्रीचे गाळे लावण्यात आले आहे. शहरातील मेनरोड, कॉलेजरोड, द्वारका, सिडको परिसरात ठिकठिकाणी गणेशमूर्र्ती विकणारे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. यावर्षी बाजीराव-मस्तानी चित्रपटातील बाजीराव रूपातील गणेशमूर्तीचे आकर्षण दिसून येत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
बाप्पांचे आगमन अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपले असून, शहरात गेल्या महिनाभरापासून गणेशमूर्ती विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. नाशिकच्या बाजारपेठेत स्थानिक कारखान्यांसह पेण, अहमदनगर आदि भागांतून गणेशमूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. शहरातील गणेशभक्तांनी आतापासूनच आपल्या आवडीची गणेशमूर्ती आरक्षित करण्यास सुरुवात केली आहे. नाशिक शहारातील ग्राहकांप्रमाणेच घोटी, इगतपुरी, जळगाव आदि भागांतून गणेशभक्तांनी गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी केली आहे. यावर्षी नेहमीच्या मूर्तीपेक्षा ‘डायमंड वर्क’ केलेल्या मूर्तीलादेखील गणेशभक्तांकडून विशेष मागणी होऊ लागली आहे. विविध रंगांतील खडे, बाजूबंद, मुकुट, सोंडपट्टी आदि आभूषणांची आकर्षक सजावट गणेशमूर्तीवर करण्यात आली आहे. घरगुती गणपती मूर्तीसह सार्वजनिक मंडळासाठी लागणाऱ्या मोठ्या आकारातील गणेशमूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. रेखीव डोळे, मूर्तीवरील इतर कोरीव काम असलेल्या मूर्ती घेण्याकडे गणेशभक्तांचा विशेष कल दिसून येतो. गणपतीमूर्तीप्रमाणे सजावटीचे साहित्यांची दुकाने सजली आहेत. थर्माेकोलचे मखर, विविध फुले- वेली, इंद्रधनुष्य, असे विविध प्रकार विक्रीसाठी दाखल झाले आहे.

Web Title: Market dressed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.