विद्यार्थ्यांनी शाळेत भरविला बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 11:10 PM2020-01-09T23:10:45+5:302020-01-09T23:11:09+5:30
नामपूर : एरवी विद्यार्थ्यांना बाजाराचा कोणताही अनुभव मिळालेला नसतो. बाजार आणि मुले यांचा संबंध दूरच, परंतु हाच अनुभव नामपूर ...
नामपूर : एरवी विद्यार्थ्यांना बाजाराचा कोणताही अनुभव मिळालेला नसतो. बाजार आणि मुले यांचा संबंध दूरच, परंतु हाच अनुभव नामपूर इंग्लिश स्कूलमध्ये मुलांना प्रत्यक्ष बाजार भरवून मिळाला. त्यांना बाजारातून होणारी भाजीपाल्याची, फळांची, किराणा मालाची आर्थिक उलाढाल प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली.
यावेळी मुला-मुलींनी विविध प्रकारचा भाजीपाला, फळे, चहा स्टॉल, किराणा स्टॉल हॉटेल स्टॉल आदी दुकाने शाळेच्या आवारात थाटली होती. बाजारातून होणारी पैशांची देवाण घेवाण, भावातील कमी जास्त तफावत, मालाचा दर्जा आदी बाबी विद्यार्थ्यांनी समजून घेण्याबरोबर, भाजीपाला मालक व गिºहाईक यांच्यात पैशांवरून होणारी घासाघीस, हमरीतुमरी, बाजारातील गर्दीचाही अनुभव घेतला.बाजार शाळेतच आल्याने विद्यार्थ्यांचे कुतूहल आणि उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. बाजार भरविण्यासाठी मुख्याध्यापक एस. एम. पाटील, उपमुख्याध्यापक ए. डी. पगार, ए. यू. बागुल यांनी मार्गदर्शन केले. पी. आर. सावंत, आर. सी. पाटील, ए.एम. बोरसे, आर. बी. पगार, आर. के. देवरे आदींनी परिश्रम घेतले.