नांदूरशिंगोटेत बाजारपेठ फुलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:17 AM2021-06-09T04:17:00+5:302021-06-09T04:17:00+5:30
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील बाजारपेठ तब्बल दोन महिन्यांनंतर सोमवारी (दि.७) पूर्णपणे उघडली. ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत शासनाने ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील बाजारपेठ तब्बल दोन महिन्यांनंतर सोमवारी (दि.७) पूर्णपणे उघडली. ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत शासनाने निर्बंध शिथिल केल्याने नागरिकांसह व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. प्रशासनाने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सर्वप्रकारचे दुकाने सुरू ठेवण्याची मुभा दिली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी उत्साहाने दुकाने उघडली. दोन महिन्यांपासून शुकशुकाट असलेल्या बाजारपेठेत सोमवारी गर्दी दिसून आली.
सिन्नर व संगमनेर तालुक्याच्या मध्यवर्ती नांदूरशिंगोटे येथे परिसरातील सर्वांत मोठी बाजारपेठ असल्याने दररोज येथे पंधरा ते वीस गावांचा संपर्क येत असतो. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी धोका अजून टळलेला नाही. नागरिकांसह व्यापाऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने निर्बंध कठोर करण्यात आले होते. अत्यावश्यक सेवेतील दुकानेवगळता उर्वरित दुकाने बंद झाल्याने बाजारपेठ ओस पडली होती. टप्प्या-टप्प्याने सकाळी ७ ते ११ या वेळेत ‘अत्यावश्यक सेवे’तील काही दुकानांना मुभा मिळाली. मात्र, अन्य दुकाने बंद होती. आता कोरोनाचा आलेख खाली आला. त्यामुळे ७ जूनपासून सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा मिळाली. दोन महिन्यांपासून ओस पडलेली बाजारपेठ बुधवारी पहिल्याच दिवशी फुलून गेली. बाजारतळ, जुना नाशिक-पुणा महामार्ग, चासनाका, निमोणनाका, बसस्थानक परिसर, जुना चास रोड, वावी रोड, अचानक चौक आदींसह बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची एकच गर्दी झाल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन झाले नाही. नागरिकांनी यापुढे कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. आतापर्यंत निर्बंध लागू असल्याने कारवाईच्या भीतीपोटी ग्रामीण भागातील नागरिक पेठेत येणे टाळत होते. निर्बंध शिथिल झाल्याने पहिल्याच दिवशी ग्रामीण भागातील नागरिकांनी प्लास्टिक कापड, ताडपत्री यांसह शेतीविषयक वस्तू साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत आले होते.
------------
रुग्णसंख्या शून्यावर
नांदूरशिंगोटे येथे एप्रिल व मे महिन्यात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. जवळपास शंभराहून अधिक रुग्ण आढळून आल्याने घबराट निर्माण झाली होती तसेच अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याने प्रशासन हतबल झाले होते. तसेच गावातील गर्दी टाळण्यासाठी जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्यानंतर कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध लावले होते. ग्रामपंचायत प्रशासन, आरोग्य विभाग, महसूल व पोलीस प्रशासनाने ठोस उपाययोजना राबवत रुग्णसंख्या कमी होण्यास मदत झाली. त्यामुळे गेल्या दहा ते पंधरा दिवसांत रुग्णसंख्या कमी झाली आहे.
-------------
लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर सिन्नरच्या बाजारपेठेत गर्दी उसळली होती. सूर्योदय संकुलसमोर तर दुचाकी लावयला जागा कमी पडली होती.. (०७ सिन्नर ३)
===Photopath===
070621\07nsk_31_07062021_13.jpg
===Caption===
०७ सिन्नर ३