ठाणगाव येथे भरतो मजुरांचा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 10:57 PM2018-09-29T22:57:41+5:302018-09-29T22:58:03+5:30

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील भाजीपाला पिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या ठाणगाव येथे दररोज सकाळी मजूर मिळविण्यासाठी बाजार भरला जात आहे. जो शेतकरी जादा मजुरी देईल त्यांचाकडे मजूर जाताना दिसत आहे. कामासाठी मजूर मिळविण्यासाठी शेतकºयांची चढाओढ दिसून येते.

Market laborers filling in Thanegaon | ठाणगाव येथे भरतो मजुरांचा बाजार

ठाणगाव येथे भरतो मजुरांचा बाजार

googlenewsNext
ठळक मुद्देचढाओढ : जास्त मजुरी देणाऱ्या शेतकºयांना पसंती

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील भाजीपाला पिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या ठाणगाव येथे दररोज सकाळी मजूर मिळविण्यासाठी बाजार भरला जात आहे. जो शेतकरी जादा मजुरी देईल त्यांचाकडे मजूर जाताना दिसत आहे. कामासाठी मजूर मिळविण्यासाठी शेतकºयांची चढाओढ दिसून येते.
ठाणगाव परिसरातून दररोज १० ते १२ ट्रक भाजीपाला भरून मुंबईला जात आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण कमी होते. तुटपुंज्या पावसावर शेतकºयांनी आपल्या शेतात वटाणा, वालपापडी, घेवडा, कोबी, टमाटे आदी पिके घेतली. कमी पाऊस असला तरीही म्हाळुंगी नदीच्या पाण्यावर पिकेही जोमात उभी राहिली आहे. काढणीसाठी आलेली पिके तोडण्यासाठी मजुरांची गरज असल्याने ठाणगाव येथे दररोज सकाळी अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा, वासाळी, तर इगतपुरी तालुक्यातील टाकेद, धामणगाव, घोटी आणि पेठ भागातील कोकणी लोक आपला उदरनिर्वाह करण्यासाठी या भागात येतात दररोज सकाळी ग्रामपंचायत परिसरात ट्रक, पिकअप व मिळेल त्या साधनाने मजूर येथे येतात. सकाळी ९ ते ४ यावेळेत शेतात काम करतात. शेतकरी मजूर मिळविण्यासाठी दुपारी तासभर सुट्टीही देतात. आपल्या शेतातील काढलेला शेतमाल लवकर विक्रीसाठी आणला तर बाहेरून आलेले व्यापारी जादा भाव देतात. शेतकºयांच्या मालाला भाव
मिळो अथवा ना मिळो परंतु शेतमजुराला ठरलेला ३०० रुपये रोज द्यावा लागतो.मजुरीवर कायमस्वरूपी तोडगा काढणार ग्रामपंचायत परिसरात सकाळी ६ वाजेपासूनच मजूर येत असल्याने शेतकºयांना मजूर मिळविण्यासाठी जावे लागते. मजुराची संख्याही अधिक असल्याने ठाणगावसह परिसरातील पाडळी, टेंभूरवाडी, हिवरे, पिंपळे तर नगर जिल्ह्यातील समशेरपूर, टहाकरी, अकोले या भागातील शेतकरी आपल्या गाड्या घेऊन शेतमजूर घेण्यासाठी येत असतात. मजुरांना सुरुवातीला २०० रुपये रोज देण्यात येत होता. आता वटाणा पिकाला समाधानकारक भाव असल्याने शेतकरीही मजुरांना दोन पैसे जास्त देण्यासाठी तयार आहे. ३०० रुपये रोजंदारी देण्यासाठी विरोध दर्शविल्यानंतर मजुरांनी जो शेतकरी जादा रोज देईल, त्यांच्याकडे जाताना दिसत आहे. याबाबत ठाणगावकर लवकरच बैठक घेऊन याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते रामदास भोर यांनी दिली.

Web Title: Market laborers filling in Thanegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.