टमाट्याचे बाजारभाव घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 12:22 AM2019-09-29T00:22:57+5:302019-09-29T00:23:33+5:30

गेल्या आठवड्यात ३० ते ३२ रु पये प्रति किलो असा बाजारभाव मिळालेल्या टमाट्याच्या दरात पावसामुळे घसरण निर्माण झालेली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे टमाटा माल खराब होत असल्याने आवकदेखील घटली आहे. शुक्र वारी (दि.२७) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्र ीसाठी आलेल्या टमाटा प्रति २० किलोच्या जाळीला चारशे रु पयांपर्यंत बाजारभाव मिळाला.

 The market price of tomatoes plummeted | टमाट्याचे बाजारभाव घसरले

टमाट्याचे बाजारभाव घसरले

Next

पंचवटी : गेल्या आठवड्यात ३० ते ३२ रु पये प्रति किलो असा बाजारभाव मिळालेल्या टमाट्याच्या दरात पावसामुळे घसरण निर्माण झालेली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे टमाटा माल खराब होत असल्याने आवकदेखील घटली आहे. शुक्र वारी (दि.२७) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्र ीसाठी आलेल्या टमाटा प्रति २० किलोच्या जाळीला चारशे रु पयांपर्यंत बाजारभाव मिळाला.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या सिन्नर तालुक्यातून टमाटा विक्र ीसाठी दाखल होत आहे. गेल्या आठवड्यात टमाटा सहाशे ते साडेसहाशे रु पये प्रति जाळी दराने विक्र ी झाला होता. परंतु गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसामुळे टमाटा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. पावसाने टमाटा पिक झोडून काढल्याने टमाट्याची उत्पादन घटले आहे. परिणामी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्र ीसाठी येणाऱ्या मालाची आवक घटल्याने बाजारभावदेखील घसरले आहे. पावसाचा परिणाम जाणवल्याने काही प्रमाणात टमाटा खराब झाला आहे. त्यातच मालाचा दर्जा घसरल्याने ग्राहकांकडून मागणी कमी झाले आहे. त्यामुळेच बाजारभाव कमी झाल्याचे टमाटा व्यापारी किरण धंदुके यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात ३० ते ३२ रु पये प्रति किलो असा बाजारभाव मिळालेल्या टमाटा मालाला मागील तीन ते चार दिवसांपासून प्रति किलोसाठी वीस रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे. आगामी कालावधीत पावसाने पुन्हा हजेरी लावली तर टमाटा मालाचे नुकसान होत आहे.
भोपळा महाग, कारली स्वस्त
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्र ीसाठी येणाºया सर्व शेतमालावर पावसाचा परिणाम जाणवला आहे. पावसामुळे भोपळ्याची आवक घटल्याने बाजारभाव तेजीत आले आहे. दोन दिवसांपूर्वी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रति नग २५ रु पये दराने भोपळा विक्र ी झाला तर कारल्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आवक वाढल्याने कारली ८ ते १० रु पये प्रतिकिलो दराने विक्र ी झाली.

Web Title:  The market price of tomatoes plummeted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.