पावसाच्या उघडिपीने पालेभाज्यांचे बाजारभाव घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:20 AM2021-08-18T04:20:53+5:302021-08-18T04:20:53+5:30

पाऊस थांबल्यामुळे बाजार समितीत सोमवारी सायंकाळी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीला आणल्याने बाजारभाव घसरले. कोथिंबिरीपाठोपाठ मेथी व कांदापात कमीत ...

Market prices of leafy vegetables declined due to the onset of rains | पावसाच्या उघडिपीने पालेभाज्यांचे बाजारभाव घसरले

पावसाच्या उघडिपीने पालेभाज्यांचे बाजारभाव घसरले

Next

पाऊस थांबल्यामुळे बाजार समितीत सोमवारी सायंकाळी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीला आणल्याने बाजारभाव घसरले. कोथिंबिरीपाठोपाठ मेथी व कांदापात कमीत कमी १० रुपये जुडी दराने विक्री झाली. पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना शेतातील शेतमाल काढणे सोपे झाले. त्यामुळे बाजार समितीत आवक वाढली होती. सायंकाळी बाजार समितीत शेतमालाची वाहने मोठ्या संख्येने दाखल झाल्याने काहीकाळ बाजार समिती आवारात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. आगामी काळात पावसाने उघडीप दिली तर आणखी मोठ्या प्रमाणात पालेभाज्या माल वाढला तर बाजारभाव काहीकाळ स्थिर राहतील, असे व्यापारी राजू भोरे यांनी सांगितले.

सोमवारी बाजार समितीत विक्रीला आणलेल्या शेतमालाला समाधानकारक बाजारभाव न मिळाल्याने त्यातच लागवड व दळणवळण खर्चदेखील न सुटल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

Web Title: Market prices of leafy vegetables declined due to the onset of rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.